Rahu Nakshatra Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, राहू हा एक अशुभ पण अचानक प्रभाव टाकणारा ग्रह सुद्धा मानला जातो. सध्या राहू कुंभ राशीत असून लवकरच त्याने नक्षत्र बदल केला आहे. येत्या ३० जून रोजी राहूने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला असून १५ नोव्हेंबर २०२७ पर्यंत तो तिथेच राहील. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगळ आहे, जो ऊर्जा, भूमी, धैर्य आणि शौर्याचा ग्रह मानला जातो. त्यामुळे राहू आणि मंगळाच्या युतीमुळे एक शक्तिशाली व स्फोटक योग तयार होतो आहे. राहूच्या धनिष्ठा नक्षत्रातील संक्रमणामुळे कोणत्या राशींवर सर्वाधिक परिणाम होईल याबद्दल जाणून घेऊयात…
मेष
मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि राहूचे मंगळाच्या नक्षत्रातील संक्रमण खूप शक्तिशाली आणि प्रभावी असू शकते. यामुळे तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तुमची प्रलंबित कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण होतील. या काळात, तुम्ही कामाच्या ठिकाणी घाई करणे टाळावे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे.
मिथुन
राहूचे मंगळ नक्षत्रातील संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. तुमच्या जुन्या योजना खूप प्रभावी ठरतील. उत्पन्नात वाढ होण्याचे प्रबळ संकेत दिसत आहेत. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळवू शकता. तुम्हाला कायदेशीर कागदपत्रांबाबत थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.
सिंह
राहूचे नक्षत्रातील संक्रमण खूप शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात. एक मोठा व्यावसायिक करार होऊ शकतो आणि या काळात तुम्ही प्रभावशाली लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. अपूर्ण कामांना गती मिळेल आणि तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये चांगले परिणाम दिसतील.
