राहू ग्रह २ ऑगस्ट रोजी शतभिषा नक्षत्रातून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे गोचर वर्षअखेरपर्यंत टिकेल. या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि मंगळ हे दोन्ही शक्तिशाली ग्रह आहेत. ज्योतिषांच्या मते, या नक्षत्रात राहिल्याने अंगारक योग तयार होईल, ज्याचा लोकांच्या मानसिक स्थितीवर आणि स्वभावावर मोठा परिणाम होईल. पण हे गोचर काही राशींसाठी शुभ असणार आहे.
मेष(Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी राहूचा धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणे लाभदायी ठरू शकते. या काळात आयुष्यात वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. या काळात उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत दिसत आहेत आणि आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक चांगली होऊ शकते. बक्कळ पैसा मिळेल ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. याशिवाय आरोग्याची काळजी घेण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक अस्वस्थतेमुळे नियमित दिनचर्येकडे लक्ष देणे चांगले.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचे नक्षत्रात गोचर अत्यंत शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला धनलाभ होईल सहज होईल. तसेच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होऊ शकता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याच्या संधी मिळतील. या काळात आत्मविश्वास वाढवून आपले प्रयत्न सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल.
धनु (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांना राहूचे धनिष्ठा नक्षत्रात गोचराचा सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. याचबरोबर व्यावसायिकांना यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नफ्यात दिवस दुप्पट आणि रात्र चौपट वाढ होईल. यामुळे कठोर परिश्रमातून चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तमच्याविरुद्धची कारस्थाने किंवा षडयंत्रे अपयशी ठरतील.
