Rahu favourite Rashi: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, १२ पैकी काही राशींवर राहू ग्रह सदैव प्रसन्न असतो.

‘या’ चार राशींवर राहू नेहमी असतो प्रसन्न

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीमध्ये राहू उच्च मानला जातो. ज्यामुळे या राशीत राहू खूप बलवान असतो. राहूच्या कृपेमुळे मिथुन राशीचे लोक नेहमी विचार करून कोणताही निर्णय घेतात. या लोकांना आयुष्यात अनेकदा अचानक यश मिळते. यांची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारते. या लोकांची आर्थिक परिस्थिती नेहमी चांगली असते. या लोकांना बाहेरच्या देशात जाण्याची संधी सहज मिळते. शिवाय या लोकांना करिअरमध्ये भरपूर यश मिळते.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशी ही राहूची मित्र राशी मानली जाते. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांवर राहू नेहमी प्रसन्न असतो. प्रत्येक कठीण संकटात राहू या राशीच्या लोकांना मित्राप्रमाणे साथ देतो. शिवाय या राशीच्या लोकांना आयुष्यात अचानक भरपूर यश मिळते. त्यांचा बँक बॅलन्स दिवसेंदिवस वाढत राहतो. इतर लोकांच्या तुलनेत या राशीच्या लोकांना अचानक प्रसिद्धी मिळते.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ रास ही राहूची अनुकूल रास आहे. योग्य वेळ आल्यावर या राशीच्या लोकांना राहू उत्तम साथ देतो. शिवाय या राशीच्या लोकांच्या मनातील सर्व इच्छा तो पूर्ण करतो. या लोकांना अचानक धनलाभ आणि यशही मिळते. हे लोक राहू आशीर्वादामुळे आयुष्यात खूप मोठे ध्येय साध्य करतात. शनी आणि राहूच्या प्रभावामुळे या लोकांचे विचार देखील खूप वेगळे असतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)