Rahu transit in Aquarius 2025: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हे ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन करतात, ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू हा अशुभ ग्रहांपैकी एक मानला जातो. त्यामुळेच राहूला ‘मायावी ग्रह’ म्हटले जाते, जो एका राशीत सुमारे १८ महिने राहतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या राहू मीन राशीत असून मे २०२५ पर्यंत तो या राशीत राहील. यानंतर तो राशीपरिवर्तन करेल. १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता राहू मीन राशीत प्रवेश करेल. यानंतर तो २४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत या राशीत राहील. राहू कुंभ राशीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होईल, तर काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. २०२५ मध्ये राहूचे कुंभ राशीतील परिवर्तनाने कोणत्या राशीचे भाग्य उजळेल ते जाणून घेऊया…

२०२५ मध्ये बुधादित्य राजयोग; ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत! बुध, सूर्यदेवाच्या कृपेने सर्व अडचणी होणार दूर?

मकर

राहू कुंभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. याचबरोबर अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चाललेल्या आर्थिक संकटातून सुटका मिळू शकले. याचबरोबर तुम्हाला कर्जातूनही दिलासा मिळू शकले. कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल. जर तुम्ही संयम आणि समर्पणाने काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकते. जीवनात सुरू असलेला गोंधळ कमी होऊ शकतो. तुम्हाला कामानिमित्त अनेक वेळा परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.

Pitru Paksha 2024 : या वर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तिथीनुसार प्रारंभ आणि समाप्तीची तारीख

कुंभ

राहूचा कुंभ राशीतील प्रवेशामुळे कुंभ राशीच्या लोकांना फायदा मिळू शकतो. शनि आणि राहू यांच्यात मैत्रीची भावना आहे. आयुष्यात काही चांगले काम करू शकाल. कुटुंबात सुरू असलेला वाद आता संपुष्टात येऊ शकतो. याच्या मदतीने नोकरीत यश मिळून नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. उत्पन्नाचे स्त्रोत खुले होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. लव्ह लाईफसुद्धा चांगली जाऊ शकते. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला खूप समाधानी आणि आनंदी वाटू शकते. या काळात आर्थिक गुंतवणुकीचा विचार करू शकता, पण विचार न करता काही करणे टाळा.