Rahu transit 2024: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. शनीनंतर राहू सर्वांत मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्यामुळे राहूला एकाच राशीत परत येण्यासाठी तब्बल १८ वर्षांचा कालवधी लागतो. राहू सध्या शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान असून, त्याचा काही राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडेल. नवग्रहांत राहूला मायावी ग्रह, असे म्हटले जाते. हा ग्रह प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. पंचांगानुसार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी राहू ग्रहाने उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये प्रवेश केला होता; जो २ डिसेंबरपर्यंत राहील. राहू देणार यश, कीर्ती (Rahu transit 2024) तूळ राहूचा उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद असेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. करिअरध्ये हवे तसे यश मिळेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. कर्जमुक्ती होईल. मकर राहूचा उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या नक्षत्रातील प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना अनेक लाभ देणारा ठरेल. या काळात व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात दूरचे प्रवास घडतील. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. हेही वाचा: ३६ दिवस बक्कळ पैसा; कन्या राशीतील ‘बुधादित्य राजयोग’ ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना करणार मालामाल कुंभ राहूचा उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या नक्षत्रातील प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा कुंभ राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या. (टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)