Rahu Gochar 2024 : ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह राशी बदलत असतो. राहूला छाया ग्रह म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार राहुला अशुभ ग्रह सुद्धा मानले जाते. जर हा ग्रह कोणत्याही राशीमध्ये अशुभ स्थितीत असेल तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात आणि जर शुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक लाभ, मान सन्मान प्रतिष्ठा, धनलाभ होण्याची शक्यता असते. राहू ३० ऑक्टोबर २०२३ पासून मीन राशीत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आता विरुद्ध दिशेन कार्यरत दिसेन ज्याचा काही राशींना फायदा होऊ शकतो. आर्थिक फायद्यांपासून उत्तम आरोग्यापर्यंत या लोकांना लाभ दिसून येईल. त्या राशी कोणत्या, जाणून घेऊ या.

तुळ

तुळ राशीमध्ये राहू ग्रह सहाव्या स्थानावर आहे ज्याचा तुळ राशीच्या लोकांना फायदा दिसून येईल. राहूला बळ मिळाल्याने तुळ राशीच्या लोकांना भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर या लोकांचा कुठे पैसा अडकला असेल तर तो पैसा परत मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळू शकतो.या दरम्यान त्यांचे नशीब चमकू शकते. कोणताही नवीन निर्णय घेताना घाबरू नका. या दरम्यान लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. मान सन्मान वाढेल. नात्यात गोडवा निर्माण होईल.

Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

हेही वाचा : Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला ‘या’ चार राशींना होणार बक्कळ धनलाभ? तुमचे नशीब पालटणार का? जाणून घ्या

मिथुन राशि

मिथुन राशीच्या लोकांना राहुची ही चाल सर्वात शुभ मानली जाते. मिथुन राशीत राहु दहाव्या स्थानावर आहे ज्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. त्यांच्या पदरी यश येईल. या लोकांच्या कामातील अडथळा दूर होईल. जर या राशीचे लोक नवीन काम हाती घेण्याचा विचार करत असाल तर यश मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना राहुची चाल शुभ फळ देईल. पुढील वर्षापर्यंत कुंभ राशीचे लोकांचा याचे शुभ परिणाम दिसून येईल.कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात स्थिरता येईल. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामात नफा मिळेल. कुटूंबाबरोबर वेळ घालवू शकाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)