Rahu Gochar 2024 : राहु मायावी ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात यांना छाया ग्रह म्हणतात. जो शनि प्रमाणे हळू हळू राशी परिवर्तन करतो. मागील वर्षी २०२३ मध्ये राहुने मीन राशीमध्ये गोचर केले होते ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे. या वर्षी राहुने राशी परिवर्तन केले नाही पण नक्षत्र परिवर्तन केले. राहु ग्रह नेहमी उलट चाल चालतो. (rahu gochar in kumbh rashi these three zodiac signs get money and wealth till year 2026)

पुढील वर्षी २०२५ मध्ये राहु राशी परिवर्तन करणार आहे. १८ मे रोजी उलट चालीमध्ये राहु कुंभ राशीमध्ये विराजमान होणार आहे ज्याचा स्वामी ग्रह शनि देव आहे. राहु शनिच्या कुंभ राशीमध्ये २०२६ पर्यंत विराजमान राहीन. राहुचा हा गोचर २०२६ पर्यंत कोणत्या राशींसाठी फायदेशीर राहीन आणि कोणत्या राशींना धन संपत्ती मिळेल, जाणून घेऊ या.

हेही वाचा : नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींवर शनिदेवांची विशेष कृपादृष्टी, मिळेल अमाप पैसा अन् मानसन्मानात होईल वाढ! प्रत्येक कामात यशाची शक्यता

मेष राशी (Aries Horoscope)

शनिच्या राशीमध्ये राहु गोचर करणार आहे ज्यामुळे मे राशीच्या लोकांना याचा फायदा दिसून येईल. व्यवसायाची स्थिती उत्तम राहीन. या लोकांना आणखी चांगली डील सुद्धा मिळू शकते. हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहीन. या लोकांना धन संपत्ती मिळू शकते. या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवावा.

मकर राशी (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी राहुचा कुंभ राशीमध्ये गोचर शुभ मानला जात आहे. राहुच्या राशी परिवर्तनानंतर या लोकांना भरपूर यश मिळेल आणि मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. घर कुटुंबात सुख व समृद्धी लाभेल. या काळात या लोकांना धनलाभ मिळू शकतो. एखाद्या जुन्या मित्राबरोबर भेट होऊ शकते.

हेही वाचा : ०६ ऑगस्ट पंचांग: लग्नाची बोलणी, आर्थिक लाभ तर नोकरदार वर्गासाठी खास दिवस; असा असेल मेष ते मीन राशींचा आठवड्याचा दुसरा दिवस

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

राहु शनिच्या कुंभ राशीमध्ये विराजमान झाल्यानंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहीन. त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. घर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. जोडीदारांबरोबर चांगले क्षण घालवू शकणार. आरोग्य उत्तम राहीन. दूरच्या ट्रिपचा हे लोक प्लॅन करू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)