scorecardresearch

Premium

१५३ दिवस राहू ग्रह ‘या’ राशींवर धन- धान्याचा वर्षाव करणार? पैसे व मान-सन्मानासह अनुभवू शकता अच्छे दिन

Rahu Gochar: राहूची दृष्टी आयुष्यात दुःख व कष्ट वाढवू शकते असा समज आहे पण मेष राशीतील राहूच्या स्थानानुसार काही राशींची चांदी होण्याची चिन्हे आहेत.

Rahu Gochar Next 153 Days These Zodiac Signs Will Earn Lakhs Of Rupees More Money Love Power Respect Astrology News Today
१५३ दिवस राहू ग्रह 'या' राशींवर धन- धान्याचा वर्षाव करणार? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rahu-Ketu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह म्हणून ओळखला जातो तर शनीच्या पाठोपाठ राहू हा अत्यंत धीम्या गतीने चालणारा ग्रह आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार १२ एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांनी राहूने मेष राशीत गोचर केले आहे. तर आता ३० ऑक्टोबर पर्यंत राहू ग्रह मेष राशीतच विराजमान असणार आहे. ३० ऑक्टोबर, २ वाजून १३ मिनिटांनी राहू गुरूच्या स्वामित्वाच्या मीन राशीत प्रवेश घेणार आहे. राहू हा एक छाया ग्रह म्हणून ओळखला जातो. राहूची दृष्टी आयुष्यात दुःख व कष्ट वाढवू शकते असा समज आहे पण मेष राशीतील राहूच्या स्थानानुसार काही राशींची चांदी होण्याची चिन्हे आहेत. सर्वाधिक फायद्यात असू शकतील अशा या राशी कोणत्या हे पाहूया…

राहूच्या दृष्टीने ‘या’ राशी होतील अपार श्रीमंत?

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीच्या गोचर कुंडलीत राहू ग्रहाचा प्रभाव हा तिसऱ्या स्थानी असणार आहे. या मंडळींच्या कॉन्फिडन्समध्ये या काळात वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही पाऊले पुढे जाण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याचीही चिन्हे आहेत. नोकरदार मंडळींना आपल्या वास्तव्याचे ठिकाण बदलावे लागू शकतो. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीची नामी संधी आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

राहू गोचर झाल्यापासून आपलट रेअशीच्या गोचर कुंडलीत सहाव्या स्थानी भ्रमण करत आहे. यामुळे येत्या काळात आपल्याला नोकरीच्या बदलाचे योग आहेत. आयुष्यातील नकारात्मकता निघून जाण्यास अनुकूल असे हे वातावरण ठरू शकते. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे गोड फळ मिळू शकते. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील विनाकारण वादात पडणे टाळल्यास हिताचे ठरू शकते. आई वडिलांच्या कृपेने तुम्हाला एखाद्या नव्या घराची खरेदी करण्याचा योग आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत राहू दहाव्या स्थानी गोचर करणार आहे. हे गोचर आपल्याला एखाद्या नव्या व्यवसाय किंवा प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी लाभदायक ठरू शकते. कुटुंबासह काही सुखाचे क्षण अनुभवता येऊ शकतात. तुम्हाला प्रवासाच्या निमित्ताने खर्च वाढल्याचे जाणवून येईल पण या माध्यमातून आपल्याला मनशांती सुद्धा लाभू शकते त्यामुळे ही एका प्रकारची गुंतवणूक ठरण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा<< २४ ऑगस्टपर्यंत बुधदेवाचे महागोचर, ‘या’ राशी होतील लखपती? तीन टप्प्यांमध्ये ‘असा’ मिळू शकतो अपार पैसा

कर्क रास (Cancer Zodiac)

राहू गोचर हे कर्क राशीच्या सुद्धा दहाव्याच स्थानी सक्रिय आहे. यामुळे आपल्याला आवडीच्या कामांसाठी वेळ काढता येऊ शकतो. आर्थिक लाभाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे. संगणक व मोबाईलशी थेट संबंधित असलेल्या कामात तुम्हाला प्रचंड प्रगतीची संधी आहे. तसेच यामुळे तुमच्याकडील लक्ष्मीचा रहिवासी सुद्धा अधिक वाढू शकतो. या काळात एखादे जुने दुखणे दूर होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahu gochar next 153 days these zodiac signs will earn lakhs of rupees more money love power respect astrology news today svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×