Rahu Transit in Kumbh Rashi : वैदिक पंचागनुसार, १८ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ८ मिनिटांनी राहु मीन राशीमधून बाहेर पडून शनिच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे.
ज्योतिषशास्रानुसार, राहु एका राशीमध्ये जवळपास १८ महिने विराजमान राहतात आणि यावेळी ते शनिच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते, राहु गोचर काही राशींवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. राहु गोचरमुळे काही राशी संकटात येऊ शकतात. त्या राशी कोणत्या आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना या दरम्यान सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आईवडिलांच्या आरोग्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यांचे वैवाहिक जीवनात तणाव दिसून येईल. जोडीदाराबरोबरचे संबंध बिघडू शकतात. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. कोणतीही गुंतवणूक करू नये, नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.

सिंह राशी

या राशीच्या लोकांना वैवाहिक नात्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या वेळी वैवाहिक नात्यात गैरसमज वाढू शकतात. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचे मत किंवा हस्तक्षेप नातेसंबंधात कटुपणा आणू शकतात. या लोकांनी संयम बाळगावा.

वृश्चिक राशी

राहुचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले मानले जात नाही. आर्थिक प्रकरणांमध्ये समाधानी राहणे चांगले राहीन. पैसा खर्च करताना खूप विचारपूर्वक करावा. गुंतवणूक करताना सतर्क राहावे.

मीन राशी

राहु गोचर मीन राशीच्या लोकांना धन संपत्ती पैशांची कमतरता जाणवेल. नोकरी किंवा व्यवसायात या लोकांना अस्थिरता जाणवू शकते.
या राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अचानक खर्चांमध्ये वृद्धी होईल. पैसा खर्च करताना काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणे टाळावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)