ज्याप्रकारे कुंडलीमध्ये सर्व ग्रहांचा प्रभाव पडतो, त्याचप्रमाणे घरातील वेगवेगळ्या भागावरही वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव पडतो. जर या स्थानांवर काही गडबड झाली तर संबंधित ग्रह घरावर वाईट प्रभाव पाडू लागतो. आज आपण घराच्या त्या भागांबद्दल जाणून घेऊया ज्यावर राहूचा प्रभाव आहे. आपल्या मनात अचानक विचार येण्याचे कारण राहु आहे. राहु बरोबर असेल तर व्यक्तीला आश्चर्यकारक कल्पना सुचतात. तसेच राहू खराब असल्यास व्यक्ती मानसिक तणावांनी घेरली जाते. ती इतरांशी कठोरपणे बोलू लागते, अनेकदा ही व्यक्ती गैरसमजाला बळी पडते. याचा बहुतेकदा शत्रू फायदा घेऊ शकतात. जर घरावर राहूचा वाईट प्रभाव असेल तर ते घर अतिशय वाईट स्थितीत दिसू लागते. रिकाम्या आणि भयानक घरांना राहूचे घर मानले जाते. याशिवाय घराभोवती निवडुंग, बाभूळ वाढणे हे देखील राहूचे घर असण्याचे लक्षण आहे. अशा घरात हत्या किंवा आत्महत्या होण्याची शक्यता असते. राहू खराब स्थितीत असल्यास घरामध्ये पाहुण्यांचे येणे कमी होते किंवा बंद होते. ‘या’ चार राशींच्या व्यक्तींवर असते महादेवाची विशेष कृपा; महाशिवरात्रीला पूर्ण होऊ शकतात सर्व मनोकामना घरातील या ठिकाणी राहतो राहुचा प्रभाव घराचा नैऋत्य कोन : घराचा नैऋत्य कोन राहुचा कोन आहे. या ठिकाणी कधीही घाण ठेवू नका, अन्यथा राहू दोष निर्माण होतो. पायऱ्या : राहुचे घराच्या पायऱ्यांवर स्थान आहे. जर त्या चुकीच्या दिशेने, तुटलेल्या किंवा घाणेरड्या असतील तर राहू वाईट परिणाम देऊ लागतो. शौचालय : शौचालय हे देखील राहूचे स्थान आहे. ते घाणेरडे, तुटलेले किंवा चुकीच्या दिशेने असल्यास राहू दोष निर्माण होतो. छप्पर : राहुचे घराच्या छतावरही स्थान असते. छतावर कचरा किंवा घाण जमा झाल्यास राहू अशुभ परिणाम देऊ लागतो. छत तुटले असले तर ते तातडीने दुरुस्त करा. काटेरी झुडूप : घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे असल्यास राहू दोष निर्माण होतो. त्यांना ताबडतोब काढा. जुने फाटलेले कपडे : जुने फाटलेले कपडे घरात ठेवल्याने किंवा फाटलेले कपडे परिधान केल्याने राहूचा कोप होतो. असे करणे टाळा. (येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)