जुलै महिन्याच्या मध्यात ग्रहांचा एक मोठा दुर्मिळ संयोग निर्माण होत आहे. ज्योतिष्यशास्त्रानुसार सूर्य, चंद्र, मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी सर्व प्रमुख ग्रह राहू आणि केतुच्या मध्यात आले आहेत. थोडक्यात हे सर्व ग्रह राहू-केतूच्या मध्यात येऊन अडकले आहेत. पण लवकरच राहू-केतूचा मायाजाळ तुटणार आहे. १९ जुलै रोजी चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल अन् राहू केतूने मध्य प्रभावातून मध्य प्रवाहातून बाहेर पडेल. सर्व ग्रहांचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे १८ जूलैपर्यंत राहू-केतूच्या मध्ये अडकलेले असल्याने काही राशींचे नुकसान होणार आहे.
राहू केतूच्या जाळ्यात कसे अडकले ग्रह
राहू -केतू नेहमी एकमेकांच्या समोर १८० अंशाच्या कोन स्थितीमध्ये असतात. या काळात राहू कुंभ राशी आणि केतू सिंह राशीमध्ये विराजमान आहे. ज्योतिष्यशास्त्रात १२ राशींचे एक पूर्ण चक्र मानले जाते. जर चद्राच्या अर्ध्या भागात कित्येक ग्रह एकत्र आले तर राहू केतूच्या मध्यात अडकतात. जसे की कुंभ पासून सिंह राशीपर्यंत अर्ध राशी चक्र निर्माण होत आहे. या दरम्या सर्व ग्रह विराजमान आहेत. सुर्य मिथुन राशीत, चंद्र कर्क राशीमध्ये, मगंळ वृषभ राशीत, बुध मिथुन राशीत, गुरू कर्क राशीत, शुक्र सिंह राशीत आणि शनी मीन राशीमध्ये विराजमान आह. आता १९ जुलैला जसे चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल तसे राहू केतूचे मायाजाळ तुटणार आहे.
सिंह राशी
सिंह राशींमध्ये केतू विराजमान आहे त्यामुळे राशीच्या लोकांवर केतूचा थेट प्रभाव होऊ शकतो. शुक्र देखील सिंह राशीत स्थित असल्याने तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि नात्यांवर परिणाम होऊ शकतो. दांपत्य जीवना प्रेम संबधामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
राहू कुंभ राशीत विराजमान आहे त्यामुळे त्याचा थेट परिणाम या राशीच्या लोकांवर होत आहे. तुमच्या करिअर आणि ऑफिसमध्ये गैरसमज किंवा अचानक बदल होण्याची शक्यता आहे. सहकर्मचाऱ्यांसह मतभेद आणि चुकीचे निर्णय घेण्याचा धोका वाढू शकतो. तुमच्यासह फसवणूक होऊ शकते.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना १९ जुलैपर्यंत सावध राहावे लागेल. सुर्य आणि गुरू दोन्ही कर्क राशीत विराजमान आहेत. अस्त गुरूचा शुभ प्रभा कमी झाला आहे. अशामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक दबाव आणि भावनात्मक निर्णय सावधानी योग्य आहे.
मिथुन राशी
या संयोग मिथुन राशींच्या लोकांवर मोठा परिणाम होत आहे. तुम्हाला वाणी, संचार आणि बुद्धीच्या प्रकरणात अनेक संकटाचा सामना करावा लागू शकतो.निर्णय घेतना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या नात्यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
