Rahu Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. सध्या राहू कुंभ राशीत असून केतू सिंह राशीत विराजमान आहे. डिसेंबरपर्यंत हे दोन्ही ग्रह याच राशीत विराजमान असतील. राहू-केतूच्या या स्थितीचा नक्कीच १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल.
राहू ‘या’ राशींचे नशीब चमकवणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूची ही स्थिती परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूची ही स्थिती अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राहू-केतूच्या सध्याच्या स्थितीचा अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
धनु (Dhanu Rashi)
राहू-केतूच्या या स्थितीमुळे धनु राशीच्या जातकांना आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल. गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय घेताना मात्र योग्य नियोजन करणे फायदेशीर ठरेल.
मीन (Meen Rashi)
मीन राशीसाठी राहू-केतूची ही स्थिती करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यातून प्रतिष्ठाही मिळू शकते. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळाल्यास त्यांचा योग्य उपयोग केल्याने प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. सातत्य आणि संयम ठेवला तर आर्थिक स्थितीतही हळूहळू सुधारणा होईल.
मिथुन (Mithun Rashi)
राहू-केतूची ही स्थिती मिथुन राशीच्या जातकांना व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन संपर्क आणि भागीदारी भविष्यात लाभदायक ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. मात्र कोणताही आर्थिक व्यवहार घाईने न करता कागदपत्रे आणि अटी तपासून करणे महत्त्वाचे राहील.
वृषभ (Vrushabh Rashi)
राहू-केतूची ही स्थिती वृषभ राशीची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकते. मेहनत आणि शिस्तीमुळे उत्पन्नात स्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबासाठी महत्त्वाच्या आर्थिक योजना पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. बचत वाढवण्यासोबतच जुन्या आर्थिक अडचणी कमी होण्याचे संकेत मिळू शकतात. दीर्घकालीन नियोजन आणि संयम ठेवल्यास या काळाचा चांगला फायदा घेता येईल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
राहू-केतूची ही स्थिती वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जबाबदारी वाढवणारी ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता असून कामातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येईल. आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य वाढण्याचे संकेत आहेत. रखडलेली कामे सातत्याने प्रयत्न केल्यास मार्गी लागू शकतात. योग्य नियोजन आणि संयमाच्या जोरावर भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार करता येई
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
