Rahu Ketu Transit: राहू मकर राशीत आणि केतू कर्क राशीत प्रवेश करणार असल्याने डिसेंबर महिन्यात अनेक राशींसाठी चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे. काही भाग्यवान राशींसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. हा राशीबदल मेष, मिथुन, कर्क, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींसाठी लाभदायक मानला जात आहे.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात यश मिळू शकते. राहू-केतूच्या राशीबदलानंतर तुमच्यासाठी चांगल्या काळाची सुरुवात होईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना मोठी डील मिळाल्यामुळे चांगला नफा होऊ शकतो.
मिथुन राशी (Gemini Horoscope)
राहू आणि केतूच्या राशीबदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ आणि पदोन्नतीची आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना मागील काही काळात अडचणी आणि तणावाचा सामना करावा लागला असेल, तर आता त्यातून दिलासा मिळू शकतो. निर्णय घेण्याची क्षमता अधिक चांगली होईल. मनःशांती मिळेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल आणि आर्थिक प्रगती होऊ शकते.
कन्या राशी (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचा वेग वाढेल आणि प्रगतीची संधी मिळेल.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला मानला जात आहे. योग्य गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.
मीन राशी (Pisces Horoscope)
राहू-केतूच्या राशीबदलानंतर मीन राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. प्रवासाचे योगही जुळून येऊ शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
