Rahu-Ketu Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
छाया ग्रह राहू आणि केतू यांनी ३१ मे रोजी आपली नक्षत्रे बदलली. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहूने पहाटे ५ वाजून ३८ मिनिटांनी शतभिषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश केला. त्याच वेळी केतूनेही मघा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, राहू आणि केतू नेहमी उलट दिशेने फिरतात, त्यामुळे या दोन छाया ग्रहांच्या भ्रमणातील बदलाचा परिणाम १२ पैका काही ५ राशींच्या लोकांवर होऊ शकतो.
राहू-केतूचे गोचर ‘या’ राशींचे भाग्य चमकवणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल.
तूळ (Tula Rashi)
या काळात तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींना राहू-केतूचे हे गोचर प्रवेश लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
