Rahu Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रात राहु-केतू यांना पापी ग्रह म्हणून ओळखले जाते आणि हे दोन्ही ग्रह नेहमी उलट दिशेने चालतात. या ग्रहांना आपली राशी बदलायला सुमारे १८ महिने लागतात. सध्या राहु कुंभ राशीत गोचर करत आहे तर केतु सिंह राशीत आहे. पण ५ डिसेंबरपासून राहु मकर राशीत प्रवेश करेल आणि केतु कर्क राशीत जाईल.
ज्योतिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांचे राशी बदलणे अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. जाणून घ्या या गोचरामुळे कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे.
वृषभ राशी (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी राहु-केतूचा गोचर खूप लाभदायक ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये अचानक प्रगती दिसून येईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. एखाद्या कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीचे प्रकरण तुमच्या बाजूने लागतील. व्यवसायात वाढ होईल. घरसुख मिळण्याची शक्यता आहे.
कर्क राशी (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी राहु-केतूचा गोचर करिअरमध्ये मोठी प्रगती देणारा ठरेल. उत्पन्नात चांगली वाढ दिसेल. नवीन काम सुरू करू शकता. दीर्घकाळ अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. जुन्या मित्राची भेट होईल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
तूळ राशी (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी राहु-केतूचा गोचर खूप शुभ मानला जात आहे. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये चांगली वाढ दिसेल. मनासारखी नोकरी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आई-वडिलांचा प्रत्येक कामात पाठिंबा मिळेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळू शकते.
कुंभ राशी (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. वाहन सुख मिळू शकते. मोठ्या नोकरीची ऑफर मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
