Rahu-Ketu Gochar: ज्योतिषशास्त्रात राहू-केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हटले जाते. हे दोन्ही ग्रह इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतात. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहांची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. हे दोन्ही ग्रह साधारणपणे दर दीड वर्षांनी आपली राशी बदलतात. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, त्यांच्या हालचालींमुळे व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाकांक्षा, गोंधळ, द्विधा मनस्थिती, आध्यात्मिक कल आणि एकाकीपणा यांसारखे अचानक बदल घडू शकतात.

डिसेंबर २०२६ मध्ये राहू आणि केतू आपली राशी बदलणार आहेत. या बदलाचा परिणाम आर्थिक स्थिती, करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, मानसिक अवस्था आणि विचार यांसारख्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर होऊ शकतो. तथापि, याचा प्रत्यक्ष परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार बदलतो, असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, राहू आणि केतू ५ डिसेंबर २०२६ रोजी त्यांच्या राशी बदलतील. या काळात राहू कुंभ राशीतून मकर राशीत, तर केतू सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. दोन्ही ग्रह अंदाजे १८ महिने त्यांच्या नवीन राशींमध्ये राहतील. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा काळ एक दीर्घ आणि महत्त्वपूर्ण गोचर मानला जातो. राहू आणि केतूची ही स्थिती अंदाजे २४ जून २०२८ पर्यंत टिकेल असे म्हटले जाते.

राहू-केतूचे गोचर मालामाल करणार

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळात अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)