Rahu Mangal Gochar 2026: ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सोमवारी राहू आणि मंगळ या दोन शक्तिशाली ग्रहांचा विशेष प्रभाव असणार आहे. आज, ३ ऑगस्टच्या काही तास आधीच मंगळाने त्याची राशी बदलली आहे आणि राहूने त्याचे नक्षत्र बदलले. दृक पंचांगानुसार, २ ऑगस्ट रोजी राहू शतभिषा नक्षत्रातून धनिष्ठा नक्षत्रात गेला. मंगळानेही त्याची राशी बदलून मिथुन राशीत प्रवेश केला. ग्रहांच्या स्थितीतील हा महत्त्वपूर्ण बदल तीन राशींसाठी धन आणि प्रतिष्ठेला चालना देणारा ठरू शकतो.

मंगळामुळे संपत्ती आणि मालमत्तेत वाढ

ज्योतिषशास्त्रानुसार, १८ सप्टेंबरपर्यंत मंगळाचे मिथुन राशीतील गोचर मेष, वृषभ, मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ राशींसाठी शुभ आहे. या काळात सर्व सहा राशींना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास उंचावलेला राहील. त्यामुळे तुमचं प्लॅनिंग अंमलात आणण्यासाठी हा चांगला काळ आहे. क्रीडा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम असेल.

राहूमुळे धन आणि यश

२ ऑगस्ट रोजी राहूने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला असून २०२६ मध्ये राहू धनिष्ठा नक्षत्राच्या विविध टप्प्यांमधून भ्रमण करेल. मंगळ हा धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी असून त्याचा शुभ प्रभाव मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशींना जाणवेल. राहू या राशींना भौतिक सुख, संपत्ती, यश आणि करिअरमध्ये प्रगती प्रदान करेल.

मंगळ आणि राहूच्या एकत्रित प्रभावामुळे मिथुन, तूळ, धनु आणि कुंभ या चार राशींसाठी पुढील दीड महिना उत्तम असणार आहे. याचा अर्थ असा की, केवळ एक दोन दिवस नाही तर संपूर्ण महिनाच या लोकांसाठी शुभ ठरू शकतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात या चार राशींना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील आणि त्यांचा फायदा घेण्यासाठी त्यांना धैर्य आणि क्षमता देखील प्राप्त होईल. त्यामुळे या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. यामुळे तुम्हाला अधिक पैसे कमविण्यात, यश मिळविण्यात, तुमच्या योजना राबवण्यात आणि एक नवीन ओळख निर्माण करण्यात मदत होईल.