Rahu Mangal Yuti 2026: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तर ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. दरम्यान, सध्या राहू कुंभ राशीत विराजमान असून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ११ वाजून ५७ मिनिटांनी मंगळ ग्रहदेखील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या कुंभ राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना लाभदायी ठरेल.

राहू-मंगळ देणार पदोपदी भरपूर यश

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या लोकांसाठीही राहू-मंगळाची युती खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही ही युती खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी राहू-मंगळाची युती खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या लोकांसाठीही राहू-मंगळाची युती आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)