Rahu Mitra Rashi: ज्योतिषशास्त्रात राहूला अनेकदा क्रूर किंवा मायावी ग्रह मानलं जातं, पण ही समज पूर्णपणे बरोबर नाही. राहू फक्त त्रास देत नाही, तर तो जर कुंडलीत चांगल्या स्थितीत असेल किंवा आपल्या मित्र राशींमध्ये असेल, तर तो माणसाला अगदी खालच्या स्तरावरून मोठ्या यशापर्यंत नेऊ शकतो.

ज्योतिषाच्या मते वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ या ६ राशी राहूच्या आवडत्या आणि मित्र राशी मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया, या राशींच्या लोकांवर राहूचा चांगला प्रभाव कसा पडतो.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, आणि शुक्र हा राहूचा खूप चांगला मित्र मानला जातो. या राशीत राहू असला तर तो व्यक्तीला भौतिक सुखांकडे आकर्षित करतो.

या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याचे योग तयार होतात. जमीन, घर आणि वाहन यांसारख्या सुखांमध्ये वाढ होते. तसेच समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण होते. राहू या राशीच्या लोकांना विविध प्रकारच्या सुख-सुविधा मिळवून देतो.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

बुधाच्या या राशीत राहूला उच्च स्थान मिळालेलं मानलं जातं. या राशीत राहू असला तर तो व्यक्तीची बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता खूप वाढवतो.

या राशीच्या लोकांची निर्णय घेण्याची ताकद आणि बोलण्याची कला खूपच चांगली होते. हे लोक लेखन, मीडिया, मार्केटिंग किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठं यश मिळवतात. तसंच, हे लोक कठीण परिस्थितीतही हार मानत नाहीत आणि शेवटी यश मिळवतात.

कन्या राशी (Virgo Horoscope)

कन्या ही देखील बुधाचीच रास आहे. या राशीत राहू व्यक्तीला खूपच व्यावहारिक आणि शहाणा बनवतो. या राशीच्या लोकांना राहू शत्रूंवर मात करण्याची ताकद देतो, म्हणजे विरोधक कितीही प्रयत्न केले तरी त्यांना फारसं नुकसान करू शकत नाहीत.

तसंच, या राशीचे लोक व्यवसायातील योजना आणि हिशोब करण्यात खूप हुशार असतात. कोर्ट-कचेरीची कामे किंवा स्पर्धा परीक्षा यांतही त्यांना मोठं यश मिळू शकतं.

तूळ राशी (Libra Horoscope)

शुक्राची ही वायुतत्त्व प्रधान रास आहे. या राशीत राहू असला तर तो व्यक्तीला कूटनीती जाणणारा आणि सगळ्यांशी मिळून-मिसळून राहणारा बनवतो. तूळ राशीच्या लोकांना राहू परदेशातून पैसे कमावण्याच्या संधी देतो. तसेच त्यांच्या सामाजिक मान-सन्मानात वाढ होते. राजकारण किंवा जनसंपर्काच्या क्षेत्रातही या राशीच्या लोकांना मोठं नाव आणि प्रसिद्धी मिळू शकते.

मकर राशी (Capricorn Horoscope)

शनीची ही रास आहे. या राशीत राहू असला तर तो व्यक्तीला मेहनती आणि जबाबदारी घेणारा बनवतो. राहूच्या चांगल्या प्रभावामुळे या राशीचे लोक कामाच्या क्षेत्रात मोठं यश मिळवतात. त्यांच्यात नेतृत्व आणि प्रशासन करण्याची क्षमता देखील खूप चांगली असते. म्हणून हे लोक तांत्रिक क्षेत्रात किंवा रिअल इस्टेटमध्ये मोठी प्रगती करतात. तसेच त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

कुंभ राशीचा स्वामीही शनी आहे. या राशीत राहू असला तर तो व्यक्तीला दूरचा विचार करणारा आणि भविष्याचा अंदाज घेणारा बनवतो. या राशीचे लोक शेअर बाजारात किंवा टेक स्टार्टअपसारख्या क्षेत्रातून मोठा नफा कमवू शकतात. राहू त्यांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची ताकद देतो. त्यामुळे हे लोक इतरांपेक्षा वेगळं काम करून कधी कधी अचानक मोठं यश मिळवतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)