Rahu Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. राहू ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तनही करतो.
पंचांगानुसार, राहू ३१ मे २०२६ रोजी शततारका नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये गोचर करेल. या नक्षत्रात तो ०२ ऑगस्टपर्यंत असेल. राहूचे हे नक्षत्र गोचर १२ पैकी काही राशींसाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे.
राहूचे नक्षत्र गोचर ‘या’ राशींना भरभराट देणार
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे नक्षत्र परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल.
मीन (Meen Rashi)
राहूच्या गोचराने मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
