Rahu Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. पंचांगानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०२ वाजून ११ मिनिटांनी राहूने शततारका नक्षत्रामध्ये प्रवेश केला होता या नक्षत्रामध्ये तो २ ऑगस्ट २०२६ पर्यंत विराजमान असेल. तो पर्यंतचा काळ काही राशींसाठी अधिक लाभदायी असेल.

राहू ‘या’ राशींना देणार पदोपदी यश

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे शततारका नक्षत्रातील वास्तव खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूची ही उपस्थिती अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूची उपस्थिती अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी देखील राहूची ही उपस्थिती अधिक फायदेशीर ठरेल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. प्रत्येक कामाला वेग येईल. गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल. नवीन नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. अविवाहितांसाठी लग्नाचे योग्य प्रस्ताव येतील. नव्या वस्तू खरेदी कराल. घरात अचानक शुभ कार्य घडू शकतात. आरोग्यही उत्तम राहील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)