Rahu Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. पंचांगानुसार, राहू १ आणि २ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजून ०८ मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. राहूचे हे परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.

राहूचे गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन (Mithun Rashi)

या काळात मिथुन राशीच्या लोकांना पूर्वी केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. काही लोकांना कोर्ट केसेसमध्ये विजय मिळू शकतो. या राशीच्या काही लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. भाऊ-बहिणींच्या सहकार्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात चांगले बदल दिसून येतील. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात उंची गाठण्याची संधी मिळू शकते.

धनु (Dhanu Rashi)

या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेटशी संबंधित कोणताही अपूर्ण व्यवहार ऑगस्टमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे बर्याच काळापासून नोकरीच्या शोधात होते त्यांना चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे विज्ञान, ज्योतिष, खगोलशास्त्र इत्यादींचा अभ्यास करत आहेत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)