Rahu Nakshatra Pada Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. पंचांगानुसार, ३१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ०२ वाजून २८ मिनिटांनी राहूच्या शततारका नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये प्रवेश करणार आहे. राहूचे हे परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
राहूचे नक्षत्र पद गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार
मिथुन (Mithun Rashi)
राहूचे नक्षत्र पद गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे पद परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
मीन (Meen Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
