Rahu Dhanishta Nakshatra Gochar 2026: आजपासून अनेक प्रमुख ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत. त्यापैकी एक राहू आहे. दृक पंचांगानुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी राहू आपले स्वत:चे नक्षत्र शतभिषा सोडून मंगळाच्या मालकीच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू हा एक मायावी ग्रह मानला जातो, जो लवकर फळ देतो. जेव्हा राहू आपली राशी किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव देश, जग आणि सर्व राशींवर जाणवतो.
धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगळ आहे. तो धैर्य, ऊर्जा तसंच जमीन आणि इमारती यांचे प्रतीक मानला जातो. परिणामी मंगळाच्या नक्षत्रातील राहूचे हे गोचर अनेक राशींना प्रगती, आकस्मिक आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये मोठी चालना देईल. राहूच्या नक्षत्रातील या बदलामुळे काही राशींना मोठा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी ते जाणून घेऊया…
मेष राशी
मेष राशीवर स्वत: मंगळ देवाचे अधिपत्य आहे. त्यामुळे राहूचा मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात मजबूत होईल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रकल्पांना अचानक चालना मिळेल. जर तुम्ही नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत अशाल तर तुमच्या यशाची शक्यता अधिक आहे.
मिथुन राशी
हा नक्षत्र बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. परदेश प्रवास किंवा दूरस्थ व्यवसायातून मोठा नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा सामाजिक प्रभाव आणि आदर वाढेल.
तूळ राशी
या काळात तूळ राशीच्या लोकांना मालमत्ता आणि गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याचे साकार होऊ शकते. शेअर बाजार किंवा मालमत्तेतील पूर्वीच्या गुंतवणुकीतून आता नफा मिळू लागेल. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धकांवर विजय मिळवाल.
कुंभ राशी
धनिष्ठा नक्षत्र कुंभ राशीशी देखील संबंधित आहे, त्यामुळे राहूचे हे गोचर तुमच्या आत्मविश्वासाला चालना देईल. तुम्हाला तुमच्या करिअरबाबत अचानक काही चांगली बातमी मिळू शकते. तंत्रज्ञान, संशोधन किंवा माध्यम क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सुवर्णमय ठरेल. अडकलेला निधी परत मिळू शकतो.
