Rahu Nakshatra Parivartan 2026: ज्योतिषशास्त्रानुसार राहूला रहस्य, अनपेक्षित घटना आणि महत्वाकांक्षेचा कारक ग्रह मानले जाते. अनेकदा लोक राहूला केवळ अशुभ फल देणारा ग्रह समजतात. परंतु, राहुच्या नक्षत्र किंवा राशी बदलाने नेहमीच वाईट परिणाम होतात असे नाही. जर तुमच्या कुंडलीत राहूची स्थिती शुभ असेल, तर तो व्यक्तीला थेट शून्यातून विश्वात पोहोचवू शकतो. राहु हा एक छाया ग्रह आहे, जो अचानक सर्व काही हिरावूनही घेऊ शकतो आणि अनपेक्षितपणे भरपूर देऊही शकतो. जेव्हा जेव्हा या ग्रहाच्या चालमध्ये बदल होतो, तेव्हा त्याचा सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पडतोच.

राहुचे नक्षत्र परिवर्तन (Rahu Nakshatra Parivartan 2026)

राहूने ३१ मे २०२६ रोजी ‘शतभिषा’ नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, राहुचे हे नक्षत्र गोचर ५ राशींसाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरणार आहे. चला जाणून घेऊया या नशीबवान राशींबद्दल:

१. वृषभ (Taurus):

वृषभ राशीच्या लोकांसाठी राहुचे हे नक्षत्र परिवर्तन अतिशय अनुकूल ठरेल. तुमच्या आर्थिक स्थितीत अचानक मोठी सुधारणा पाहायला मिळेल. १ जूनपासून तुमच्या नशिबाचे तारे चमकणार असून प्रत्येक कामात यश मिळण्याचे मजबूत योग आहेत. तुमचे एखादे मोठे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

२. मिथुन (Gemini):

मिथुन राशीच्या लोकांसाठी राहुचे गोचर एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल, ते काम यशस्वीरीत्या पूर्ण होईल. आर्थिक बाबींत मोठी सुधारणा पाहायला मिळू शकते. व्यवसायात बंपर नफा कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात आणि प्रवास फायदेशीर ठरेल.

३. तूळ (Libra):

तूळ राशीच्या लोकांसाठी राहुचा हा बदल अत्यंत लाभदायी ठरणार आहे. करिअरमध्ये जबरदस्त प्रगती आणि पदोन्नती पाहायला मिळेल. व्यापारात चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. तसेच, जोडीदारासोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होतील.

४. धनु (Sagittarius):

धनु राशीच्या लोकांसाठी हे नक्षत्र गोचर चौफेर लाभ देणारे ठरेल. कार्यक्षेत्रात (ऑफिसमध्ये) तुमच्या कामाचे भरभरून कौतुक होईल. नवीन नोकरी मिळण्याचे उत्तम योग आहेत. एखाद्या खास आणि प्रभावशाली व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. धार्मिक कार्यात आणि पूजेमध्ये तुमचे मन रमेल.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)