Rahu Nakshatra Transit 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला मायावी ग्रह मानले जाते. यासोबतच राहुला छाया ग्रह असेही म्हणतात. राहू ग्रह सध्या मेष राशीत आहे. ज्यावर मंगळ ग्रहाचे राज्य आहे. दुसरीकडे मेष राशीत राहूसोबत शुक्र देखील उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि शुक्र यांच्यात मैत्री आहे. त्यामुळे त्यांची युती शुभ मानली जाते. आता राहू ग्रह कृत्तिका नक्षत्रातून बाहेर पडून भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहेत. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण ३ राशींना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.

या दिवशी होणार नक्षत्र बदल :
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू ग्रह सध्या कृतिका नक्षत्रात भ्रमण करत आहे. दुसरीकडे सूर्य देव कृतिका नक्षत्राचा स्वामी आहे. ज्याला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. राहु ५ ऑक्टोबर २०२१ रोजी कृत्तिका नक्षत्रात आला. आता सुमारे ९ महिन्यांनंतर राहूने या नक्षत्रातील प्रवास पूर्ण करून भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, राहू मंगळवार १४ जून २०२२ रोजी सकाळी ८.१५ वाजता भरणी नक्षत्रात प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार भरणी नक्षत्रावर शुक्र ग्रहाचे राज्य आहे आणि देवता यम आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो…

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

आणखी वाचा : तुमच्या जन्म दिवसावरून जाणून घ्या, तुमच्या नशीबाचे तारे कधी चमकणार ?

मेष : राहु ग्रह तुमच्या राशीत भ्रमण करत आहे. तसेच शुक्र मेष राशीमध्ये स्थित आहे. त्यामुळे राहू देव आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु नातेसंबंधात काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बोलण्यावर थोडा संयम ठेवा. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते मिळू शकतात.

वृषभ : तुमच्या राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि शुक्र यांच्यात मैत्री आहे. त्यामुळे हा नक्षत्र बदल तुमच्यासाठी पैशाच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.

आणखी वाचा : २४ तासांनंतर शनिदेव होणार वक्री, ‘या’ राशींच्या व्यक्तींचे नशीबाचे दरवाजे उघडणार

तूळ : भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश तुम्हाला चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. यावेळी तुम्ही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता किंवा मालमत्तेत गुंतवणूक देखील करू शकता. यासोबतच तुम्हाला राजकारणात यशही मिळू शकते किंवा पदही मिळू शकते.