Rahu Rashi Gochar 2026: ज्योतिष शास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. नव्या वर्षातही राहूचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर नक्कीच पाहायला मिळेल.

पंचांगानुसार, २०२६ मध्ये राहू दोन वेळा राशी परिवर्तन करेल. ०२ ऑगस्ट २०२६ रोजी राहू कुंभ राशीत असताना धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. त्यानंतर ०५ डिसेंबर २०२६ रोजी राहू मकर राशीत गोचर करेल. २०२६ मध्ये होणारे हे गोचर नक्कीच काही राशींचे भाग्य चमकवेल.

राहूचे गोचर ‘या’ राशींचे आयुष्य बदलणार

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठी राहूचे हे गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा मानसिक तणाव दूर होईल आणि कौटुंबिक तणाव दूर होईल. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात भरभराट होईल. उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवाल, बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल. आरोग्य चांगले राहील. मनाप्रमाणे जगाल, येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यास समर्थ असाल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)