अशुभ ग्रह मानल्या जाणाऱ्या राहूने आपल्या भ्रमणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी राहूने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला असून, तो १० एप्रिल २०२७ पर्यंत याच नक्षत्रात राहील. ज्योतिषशास्त्रात राहू हा भ्रम, महत्त्वाकांक्षा आणि आकस्मिक बदलांचा कारक मानला जातो, तर धनिष्ठा नक्षत्र हे संपत्ती, ध्येय, लय, धैर्य, कीर्ती व सामूहिक प्रभावाशी संबंधित आहे. त्यामुळे पुढील सुमारे आठ महिन्यांचा हा काळ अनेकांच्या जीवनात मोठे चढ-उतार आणू शकतो. ज्योतिषी दिलीप गुप्ता यांच्या मते, खालील पाच राशींच्या व्यक्तींनी या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
या ५ राशींनी बाळगावी विशेष दक्षता(These 5 zodiac signs should be especially careful):
कर्क -लपवलेले रहस्ये उघड होण्याची शक्यता-:(Cancer Chance of hidden secrets being revealed):
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने काहीसा अस्थिर राहू शकतो. जुनी अथवा लपवलेले रहस्ये बाहेर आल्याने मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. काही प्रसंगांत उसने पैसे घेण्याची वेळही येऊ शकते. भावनिक भरात निर्णय घेणे टाळा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणालाही पैसे उधार देणे टाळा. अतिविचार केल्याने चिंता व अस्वस्थता वाढू शकते.
कन्या – ऑफिसमधील राजकारणाचा त्रास : (Virgo- troubled by office politics):
राहूच्या या नक्षत्र बदलामुळे कन्या राशीच्या व्यक्तींचे दैनंदिन वेळापत्रक आणि आरोग्य प्रभावित होऊ शकते. क्षुल्लक गोष्टींमध्ये वेळ व ऊर्जा वाया जाण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील राजकारण आणि कामाचा अतिरिक्त ताण मानसिक दबाव निर्माण करू शकतो. आपली ऊर्जा विधायक कामांत लावा आणि कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. महत्त्वाची कामे, अधिकृत कागदपत्रे, औषधे आणि कामाच्या डेडलाइन्सकडे विशेष लक्ष द्या.
मकर – अचानक आर्थिक चढ-उतार : (Capricorn -sudden financial ups and downs):
मकर राशीच्या व्यक्तींनी या काळात आर्थिक व्यवहारांत कमालीची सतर्कता बाळगावी. अचानक मिळणाऱ्या पैशामुळे महागड्या अथवा अवाजवी वस्तू खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो. अशा सुखासीन गोष्टी मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्याचा विचार मनात येऊ शकतो; त्यामुळे स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरेल. कोणतीही मोठी आर्थिक जोखीम पत्करणे किंवा इतरांच्या अवास्तव आश्वासनांवर विश्वास ठेवणे टाळा. आपल्या वाणीवर ताबा ठेवा, अन्यथा संबंध बिघडू शकतात.’
कुंभ – प्रतिष्ठेला धोका : (Aquarius -threat to reputation):
कुंभ राशीसाठी हा काळ सामान्यतः अनुकूल असला, तरी राहूच्या प्रभावामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम तुमची सामाजिक प्रतिमा, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासावर होऊ शकतो. आयुष्यात मोठे बदल करण्याची तीव्र इच्छा होईल, परंतु योग्य निर्णय घेणे कठीण जाईल. या काळात अहंकार बाजूला ठेवणे गरजेचे आहे. तसेच, पुरेशी झोप घेणे आणि मानसिक शांतता जपण्याला प्राधान्य द्या.
मीन – अनामिक भीती आणि एकटेपणा : Pisces (Anonymous Fear and Loneliness):
मीन राशीच्या व्यक्तींना या काळात एका अज्ञात भीती किंवा चिंतेने ग्रासले जाण्याची शक्यता आहे. निद्रानाश, वाढता खर्च आणि एकटेपणाचा त्रास होऊ शकतो. परिस्थितीपासून पळ काढण्याची मानसिक वृत्ती निर्माण होऊ शकते. आपल्या खाजगी गोष्टी किंवा भावना प्रत्येकासमोर मांडणे टाळा. केवळ एखाद्या विश्वासू व्यक्तीशी किंवा थेरपिस्टशी मनमोकळेपणाने बोला. या काळात अध्यात्माचा मार्ग धरल्यास मानसिक शांती मिळण्यास मदत होईल.
