Rahu Shukra Budh Yuti: ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते. तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, सध्या राहू कुंभ राशीत विराजमान असून आता शुक्र आणि बुध देखील याच राशीत विराजमान आहे. कुंभ राशीत राहूबरोबर शुक्र आणि बुधाची युती अनेक चांगले बदल घडवून आणू शकते.
राहू-शुक्र-बुध देणार पदोपदी भरपूर यश
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या लोकांसाठीही या तीन ग्रहांची युती खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही ही युती खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहू-शुक्र-बुधाची युती खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या लोकांसाठीही तीन ग्रहांचे कुंभ राशीतील युती आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

