Rahy Transit: राहू नेहमी वक्री (उलट्या) चालीनं गोचर करतो. सध्या राहू शनीच्या राशीत गोचर करत आहे. मायावी ग्रह राहू गेल्या वर्षापासून कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे.
हिंदू पंचांगानुसार, यंदा ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी राहू राशी बदलून मकर राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत राहू कुंभ राशीतच राहणार आहे. कुंभ राशीतील राहूचं गोचर काही राशींसाठी खूप शुभ ठरू शकतं. अशा परिस्थितीत, पंडितजींकडून जाणून घेऊया की डिसेंबरपर्यंत राहू कुंभ राशीत असल्यामुळे कोणत्या राशींना चांगली बातमी मिळू शकते.
ज्योतिषाचार्य पंडित नरेंद्र उपाध्याय यांच्या मते, राहू तिसऱ्या, सहाव्या आणि अकराव्या भावात शुभ फळ देतो. सध्या राहू मेष राशीच्या अकराव्या भावात असल्यामुळे लाभ देईल. धनु राशीच्या तिसऱ्या भावात असल्यामुळेही शुभ परिणाम मिळतील. तसेच कन्या राशीच्या सहाव्या भावात असल्यामुळे हा काळ लाभदायक मानला जात आहे.
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी राहूचं कुंभ राशीत असलेलं गोचर फायदेशीर ठरू शकतं. येणाऱ्या काळात तुम्ही आखलेल्या प्रत्येक योजनेला यश मिळू शकतं. आरोग्याची काळजी घ्या आणि सकस आहार घ्या. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. योग्य नियोजनामुळे व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी राहूचं कुंभ राशीत असलेलं गोचर लाभदायक ठरू शकतं. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायातील पैशांबाबतचा तणाव कमी होईल. जोडीदारासाठी वेळ काढा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी राहूचं कुंभ राशीत असलेलं गोचर शुभ ठरू शकतं. आरोग्य चांगलं राहील. व्यवसायातील अडकलेले पैसे परत मिळू शकतात. योग्य निर्णयक्षमता आणि समजूतदारपणामुळे कामातील कामगिरी सुधारेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात चांगलं लक्ष लागेल.
राहू कुंभ राशीत असताना कोणता उपाय करावा?
राहू ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी किंवा राहूला प्रसन्न करण्यासाठी खालील मंत्राचा जप करावा.
ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः। ॐ रां राहवे नमः॥
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
