Rahul Gandhi: राहुल गांधींना कधी काळी पप्पू म्हणून हिणवत राजकीय पटलावरून बेदखल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता तेच राहुल गांधी २०२४ साली विरोधी पक्षनेते झाल्यानंतर सरकारवर तुटून पडत आहेत. विविध मुद्दे उचलून संसदेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारे राहुल गांधी रस्त्यावरही आक्रमक झालेले दिसतात. जंतर-मंतरवरील आंदोलन सुरू असताना पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या मांडणे, विद्यार्थ्यांशी-आंदोलकांशी थेट संवाद साधत सरकारला जाब विचारणे किंवा तळागाळातील विविध घटकांच्या समस्या समजून घेणे, अशा राजकीय भूमिकांमुळे राहुल गांधींची आता चर्चा होत असते. काँग्रेसकडून त्यांना पंतप्रधानपदाचे दावेदार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्पूर्वी पुढील तीन वर्ष त्यांच्यासाठी कसे असतील, याबद्दल ज्योतिषी विक्रम चंदीरामानी यांनी माहिती दिली आहे.
राहुल गांधींच्या राजकीय प्रवासातील तीन महत्त्वाचे टप्पे
ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या आयुष्यातील दशांचा विचार केला तर तीन वेगवेगळे टप्पे दिसतात:
- २००२ ते २०१२ – चंद्र महादशा: या काळात त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. वारसा, कुटुंब आणि स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्याचा हा काळ होता.
- २०१२ ते २०१९ – मंगळ महादशा: या काळात नेतृत्व, संघर्ष आणि राजकीय आव्हाने वाढली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठे चढ-उतार झाले.
- २०१९ ते २०३७ – राहू महादशा: या काळात त्यांच्या राजकीय आयुष्यात मोठे बदल आणि पुनर्बांधणी होत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून सांगितले जाते.
- २००४ मध्ये राजकारणात प्रवेश
राहुल गांधींनी २००४ मध्ये अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या कुंडलीत चंद्र महादशा आणि राहू अंतर्दशा होती, असे या विश्लेषणात सांगितले आहे. अमेठीतून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्याच काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सत्तेत आली आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यामुळे राहुल गांधींचा राजकारणातील प्रवेश थेट राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी झाला. त्यानंतर त्यांनी सरकारमध्ये मंत्री होण्याऐवजी पक्षाच्या कामावर अधिक लक्ष दिले. त्यांनी ग्रामीण भागात प्रवास केला आणि गरिबी, सामाजिक असमानता, सामान्य लोकांचा सहभाग आणि दुर्बल घटकांचे प्रश्न यावर भर दिला. हे त्यांच्या कुंडलीतील तूळ लग्न, गुरू आणि धनु चंद्राशी संबंधित असल्याचे ज्योतिषीय विश्लेषणात म्हटले आहे.
२०२६ ते २०२९ हा काळ कसा असेल?
ज्योतिषीय अंदाजानुसार २०२६ ते २०२९ हा राहुल गांधींसाठी महत्त्वाचा काळ ठरू शकतो. त्यांच्या राजकीय प्रभावात आणि लोकप्रियतेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सप्टेंबर २०२६ पासून काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात, तर फेब्रुवारी-मार्च २०२७ हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असा अंदाज आहे.
२०२७ च्या उत्तरार्धात त्यांचे राजकीय वजन आणखी वाढू शकते. विरोधक आणि मित्रपक्ष दोघांनाही त्यांच्याकडे अधिक गांभीर्याने पाहावे लागू शकते. युती करण्याची आणि विविध राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची त्यांची क्षमता वाढू शकते, असा ज्योतिषीय अंदाज आहे.
पुढील तीन वर्षांत त्यांना अधिक मोठी राजकीय जबाबदारी किंवा सत्ता मिळण्याची शक्यता असल्याचेही या विश्लेषणात सांगितले आहे. त्यामुळे २०२६ ते २०२९ हा काळ राहुल गांधींच्या राजकीय आयुष्यातील निर्णायक काळ ठरू शकतो.
महत्त्वाची टीप: वरील सर्व माहिती ज्योतिषीय मान्यता आणि अंदाजांवर आधारित आहे. या दाव्यांची निश्चित पुष्टी झालेली नाही. त्यामुळे याकडे भविष्यवाणी म्हणून नव्हे, तर ज्योतिषीय विश्लेषण म्हणून पाहावे
