राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती
उदयराज साने सांगतात की, एप्रिल २०२३ पर्यंत हे राहूचे गोचर भ्रमण व मूळ कुंडलीतील हर्षल यांचे षडाष्टक सुरू राहणार असल्याने राजकीय पटलावर यापासून पक्षाला खूप फायदा झाला असे दिसणार नाही. राहुल गांधींच्या पत्रिकेतील गुरु-बुध राजयोग कारक असले आणि रवी-गुरु यांचा नवपंचम योग कुंडलित असूनही, राहू-हर्षल षडाष्टक, चंद्र-प्लुटो केंद्रयोग व बुध-राहू केंद्रयोग असल्याने, शुभ ग्रहांवर पाप ग्रहांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. राजकीय कुरुक्षेत्रावर म्हणूनच त्यांना इंचभरही आगेकूच करता आलेली नाही. २०२३ च्या विधानसभांच्या निवडणुकांमध्येही त्यांना फारसे यश मिळेल असे वाटत नाही.
राहुल गांधींचा शत्रू ठरतोय…
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यामागे नेमकं काय कारण ठरलं याविषयी ग्रह सांगतात की, “राहुल गांधींच्या पत्रिकेत शुभ ग्रहांच्या योगाला पाप ग्रहांचा घट्ट विळखा असल्याने त्यांना मिळणारे मार्गदर्शक हे चांगले नाहीत. त्यामुळेच त्यातून उद्भवणाऱ्या या सर्व गोष्टी आहेत. पाप ग्रहांची दशा राहुल गांधी यांच्या कुंडलीत सातत्त्याने असल्याने त्यांचं नेतृत्व पुढे येऊ शकत नाही. “
Photos पाहा<< खासदारकी गेली, दोन वर्षांची शिक्षा झाली… राहुल गांधींवरील कारवाईच्या मागील नेमकं प्रकरण जाणून घ्या
राहुल गांधींसमोर अडथळा काय?
दरम्यान, भारताची सध्याची परिस्थिती व त्यातून देशाला कशाप्रकारे यातून बाहेर काढू शकतो याबद्दल कोणताही नवा उपाय अथवा नवी कल्पना किंवा आराखडा राहुल गांधी यांच्या जवळ नाही. राजकारणात केवळ टीका करून भागत नाही तर जनतेला पर्याय द्यावा लागतो. असा पर्याय सध्या तरी राहुल गांधी यांच्याकडे नसल्याने जनता त्यांच्यापासून थोडी दूर असल्याचे दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या सर्व निवडणुकांत वाट्याला पराभवच आलेला आहे.
(टीप: वरील लेख हा तज्ज्ञांच्या माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)