Mulank 3 People Personality Like Rajnikanth: तुमच्या राशीप्रमाणेच तुमची जन्मतारीख देखील तितकीच महत्त्वाची असते. कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्र देखील भविष्याबाबत अंदाज वर्तवू शकते असे मानले जाते. काही लोक जन्मत: खडतर मार्ग घेऊन आले असले तरी त्यांचे नशीब पालटेल याचा काही नेमक नसतो. याचं उदाहरण म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. आज १२ डिसेंबर रजनीकांत यांचा वाढदिवस आहे. तारखेप्रमाणे त्यांचा मूलांक ३ हा आहे. त्यांच्या नावानेच सिनेमे चालतात आणि थिएटर हाऊसफुल होऊन जातात. मात्र, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. शिवाय क्रिकेटपटू युवराज सिंग यानेदेखील त्याच्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिले आहे. क्रिकेट जगतातले त्यांचे विक्रम आणि त्याने कॅन्सरवर केलेली मात सगळ्यांनीच पाहिली आहे. आज, १२ डिसेंबर रोजी सुपरस्टार रजनीकांत आणि क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा वाढदिवस आहे. अंकशास्त्रानुसार, त्यांचा मूलांक ३ आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंबाबत अधिक जाणून घेऊ…

३ हा आकडा खूप खास आहे. अंकशास्त्रात, ३ हा आकडा खास मानला जातो. कारण तो गुरूचा आकडा आहे. अंकशास्त्रानुसार, ३ ही संख्या गुरूला ग्रह मानते. गुरू हा कीर्ती, भाग्य, आनंद आणि ज्ञानाचा कारक आहे. गुरू भाग्य देतो आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रात तो शुभ ग्रह मानला जातो.

बुद्धिमान व्यक्तिमत्व

३ मूलांकाचे लोक बुद्धिमान, क्रिएटिव्ह, महत्त्वाकांक्षी, मेहनती, धाडसी आणि नियमांचे पालन करणारे असतात. हे गुण त्यांना आयुष्यात मोठे यश आणि प्रसिद्धी मिळवण्यास मदत करतात. ते कोणत्याही क्षेत्रात उच्च पदावर पोहोचतात.

स्वाभिमानी

या मूलांकाच्या लोकांमध्ये स्वाभिमानाची भावना तीव्र असते आणि त्यांना कोणासमोर झुकणे आवडत नाही. ते आध्यात्मिक आणि धार्मिक देखील असतात आणि त्यांचा मूळ स्वभाव कायम शिकत राहणे आणि पुढे जाणे हा असतो.

स्वत:च्या बळावर कमवतात संपत्ती

या मूलांकाचे लोक गरिबीत जन्माला आले तरी ते स्वत:च्या बळावर प्रचंड संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवतात. ते कधीही हार मान नाहीत. ते कोणत्याही आव्हानांवर मात करतात. अभिनेता रजनीकांत यांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात खूप संघर्ष केला. त्यांनी सुरूवातीच्या काळात पोर्टर आणि बस कंडक्टर म्हणून काम केले. तसंच क्रिकेटपटू युवराज सिंगने एक उज्ज्वल कारकीर्द घडवली आणि कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात केली.