ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक राशीचा एक भाग्यवान रंग असतो. हा लकी कलर आपल्यासोबत ठेवला तर ते आपल्यासाठी शुभ असते. अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावांच्या लकी रंगानुसार त्यांच्या मनगटावर राखी बांधली तर ते भावांसाठी शुभ असते. आज आपण बहिणींनी भावांसाठी राखी निवडताना कोणता रंग निवडायचा ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भावाच्या राशीनुसार निवडा राखी

मेष – ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे. त्यामुळे जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर त्याच्यासाठी लाल रंगाची राखी निवडणे शुभ राहील.

वृषभ – या राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह शुक्र आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा शुभ रंग पांढरा मानला जातो. वृषभ राशीच्या भावांसाठी तुम्ही पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची राखी खरेदी करू शकता.

Raksha Bandhan 2022: राखी बांधताना तीन गाठी बांधण्याचे महत्त्व काय? यंदाच्या रक्षाबंधनाला ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

मिथुन – या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. तसेच, या राशींचा लकी कलर हिरवा आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी मिथुन राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधल्याने भाऊ आणि बहीण दोघांचीही बुद्धी तल्लख होते.

कर्क – या राशीच्या लोकांसाठी पांढरा रंग शुभ मानला जातो. यामुळे या राशीच्या भावांना पांढऱ्या रंगाची राखी बांधल्यास त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल.

सिंह – ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. या राशीचा शुभ रंग लाल किंवा पिवळा आहे. अशा स्थितीत ही रास असलेल्या भावाला या रंगाची राखी बांधल्यास शुभ फळ मिळते.

कन्या – बुध ग्रह कन्या राशीचा अधिपती ग्रह आहे. अशा स्थितीत त्यांचा शुभ रंग हिरवा असतो. त्यामुळे कन्या राशीच्या भावाला हिरव्या रंगाची राखी बांधा. असे केल्याने तुमच्या भावाचे प्रत्येक कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल.

तूळ – ज्योतिष शास्त्रानुसार तूळ राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. या राशीच्या भावांच्या मनगटावर बहिणींनी गुलाबी रंगाची राखी बांधावी. असे केल्याने भावाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

वृश्चिक – या राशीचा शासक ग्रह मंगळ आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग लाल किंवा मरून आहे. या राशीच्या भावांच्या मनगटावर याच रंगाची राखी बांधा. यामुळे तुमच्या भावाला शत्रूंवर विजय मिळेल.

Raksha Bandhan 2022 : भावाच्या हातावर चुकूनही बांधू नका ‘ही’ राखी; ज्योतिषशास्त्रानुसार मानली जाते अशुभ

धनु – या राशीचा स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे त्यांचा लकी रंग पिवळा किंवा केशरी आहे. व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यासाठी बहिणींनी आपल्या धनु राशीच्या भावांच्या हातावर पिवळ्या किंवा लाल रंगाची राखी बांधावी.

मकर – शनि हा या राशीचा अधिपती ग्रह आहे, त्यामुळे त्याचा शुभ रंग निळा किंवा जांभळा आहे. शनिदेवाची कृपा कायम ठेवण्यासाठी बहिणी भावांच्या मनगटावर निळ्या रंगाची राखी बांधतात.

कुंभ – या राशीचा अधिपती ग्रहही शनि आहे. त्यामुळे आपल्या भावाच्या आनंदासाठी बहिणींनी त्यांना जांभळ्या रंगाची राखी बांधावी.

मीन – या राशीचा अधिपती ग्रह गुरू आहे आणि त्यांचा शुभ रंग पिवळा किंवा केशरी आहे. भावाला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बहिणींनी आपल्या भावाच्या हातावर केशरी रंगाची राखी बांधावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan 2022 choose the color of rakhi according to your brother zodiac sign this year all wishes will be fulfilled pvp
First published on: 06-08-2022 at 22:21 IST