Raksha Bandhan Muhurta: रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे. भारतातील विविध भागांबरोबरच जगभरात राहणारे हिंदू लोकही हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा रक्षाबंधनाचा सण २८ ऑगस्ट म्हणजेच आज साजरा केला जात आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. तर भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे आणि प्रत्येक परिस्थितीत तिची साथ देण्याचे वचन देतात.

पौराणिक मान्यतेनुसार, राजसूय यज्ञादरम्यान भगवान श्रीकृष्ण यांच्या बोटातून रक्त येत असताना द्रौपदीने आपल्या पदराचा एक तुकडा बांधला होता. या घटनेचा संबंध रक्षासूत्राच्या परंपरेशी जोडला जातो. तसेच, रक्षाबंधनाच्या दिवशी वेदांचे अध्ययन करणारे ब्राह्मण यजुर्वेदाच्या पठणाला सुरुवात करतात आणि या दिवशी शिक्षणाची सुरुवात करणेही शुभ मानले जाते. रक्षाबंधनाचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो.

रक्षाबंधनावर भद्रेची छाया असेल का? (Bhadra Timings 2026)

आज भद्रा नाही. पौराणिक मान्यतेनुसार, भद्रा ही सूर्यदेवांची कन्या आणि शनिदेवांची बहीण आहे. शनिप्रमाणेच तिचा स्वभावही क्रूर मानला जातो. भद्रा या शब्दाचा अर्थ कल्याण करणारी असा असला तरी, भद्रा काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. राशीनुसार भद्रा तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करते. भद्रा पृथ्वीलोकात असताना शुभ कार्यांमध्ये अडथळे येतात, अशी मान्यता आहे.

भद्राकाळ अत्यंत अशुभ मानला जातो. या काळात शुभ आणि मांगलिक कार्य करणे वर्ज्य असते. पृथ्वीलोकातील भद्रा सर्व कामांचा नाश करणारी असते, अशी धार्मिक मान्यता आहे.

भद्रेची वेळ (Bhadra Timing)

भद्रेची छाया २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी सुरू झाली होती आणि रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी संपली. त्यामुळे आज भद्रेची छाया नाही.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat)

राखी बांधण्याचा पहिला मुहूर्त सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत होता. तसेच, अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत आहे. या वेळेतही तुम्ही आज राखी बांधू शकता.

शुभ चौघडिया: दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपासून ते २ वाजून ३ मिनिटांपर्यंत
अपराह्न काळ (दुपारनंतरचा काळ): दुपारी १ वाजून ४४ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत
चर चौघडिया: संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांपासून ते ६ वाजून ४८ मिनिटांपर्यंत

रक्षाबंधनाची पूजा विधी (Raksha Bandhan Pujan Vidhi)

राखी बांधण्यापूर्वी भाऊ आणि बहीण दोघेही उपवास करू शकतात. सर्वप्रथम पूजेचे ताट तयार करा. त्यामध्ये रोली, चंदन, अक्षता, दही, रक्षासूत्र आणि मिठाई ठेवा. तसेच, ताटात तुपाचा एक दिवाही ठेवा. सर्वप्रथम रक्षासूत्र आणि पूजेचे ताट देवाला अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घ्या.

त्यानंतर भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवा. सर्वप्रथम भावाच्या कपाळावर टिळा लावा आणि त्यानंतर त्याच्या मनगटावर रक्षासूत्र बांधा. त्यानंतर भावाची आरती करा, त्याला मिठाई खाऊ घाला आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करा.

रक्षासूत्र किंवा राखी कशी असावी?

रक्षासूत्र हे तीन धाग्यांचे असावे- लाल, पिवळा आणि पांढरा. रक्षासूत्राला चंदन लावलेले असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. काहीच उपलब्ध नसेल तर श्रद्धेने कलावाही बांधू शकता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)