Aajche Rashi Bhavishya 26 March 2026 In Marathi : आज २६ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. त्याचबरोबर शोभन योग जुळून येईल आणि आद्रा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून २ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजता सुरु होईल ते ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज राम नवमी असणार आहे. तर राम नवमीचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, २६ मार्च २०२६ (Horoscope Today 26 March 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
आवडते खेळ खेळाल. मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल. लहानांशी मैत्री कराल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील. घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांचे भर भरून कौतुक कराल.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे बंधन पाळावे लागेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
घरगुती कामात दिवस जाईल. आपलेच म्हणणे खरे कराल. नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो. मुलांची समस्या दूर करावी.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
पचनाचा त्रास जाणवेल. गप्पांमधून मतभेद वाढू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कमी श्रमात कामे करण्याकडे भर राहील. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल. सासुरवाडीचे लोक भेटतील. अचानक धनलाभ संभवतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल. महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत. पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. थोडीफार दगदग वाढू शकते.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
बौद्धिक चलाखी दाखवाल. समय सूचकता ठेवावी लागेल. फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
सामाजिक दर्जा उंचावेल. मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
