Daily Horoscope 5 November 2026 : उद्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असणार आहे. उद्या शुक्ल योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जुळून येईल. उद्या अभिजात मुहूर्त ११ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल आणि राहू काळ १ वाजून ३३ मिनिटांनी सुरु होईल ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रमा एकादशी असणार आहे. तुमचा आजचा दिवस कसा जाणार जाणून घेऊ.

आजचे पंचांग व राशिभविष्य, ५ नोव्हेंबर २०२६ (Horoscope Today 5 November 2026 in Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

दैनिक मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर