6 October 2024 Panchang & Rashi Bhavishya: आज ६ ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल पक्षातील उदया तिथी तृतीया आणि रविवार आहे. तृतीया तिथी रविवारी सकाळी ७.५० पर्यंत राहिल, त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होईल. आज विनायक श्री गणेश चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. यादिवशी गणपती बाप्पाची विशेष पुजा- अर्चा केली जाईल. नवरात्रीच्या काळात आलेली ही विनायकी चतुर्थी विशेष आहे.
६ ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी माँ दुर्गेचे पाचवे रूप म्हणजे माँ कुष्मांडाची पूजा केली जाईल. रविवारी संपूर्ण दिवस प्रीति योग असणार आहे जो बुधवारी सकाळी ६ वाजून ४० वाजेपर्यंत राहील. तसेच आज रात्री १२ वाजून ११ मिनिटांपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवस विशाखा नक्षत्र जागृत असेल. आज राहुकाल दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटांपर्यंत असेल. चंद्र आज तूळ राशीत भ्रमण करेल .तर आज सूर्योदय ६ वाजून १७ वाजता होईल आणि सूर्यास्त सायंकाळी ६ वाजता होईल.एकूणच रविवारी आलेल्या विनायक चतुर्थीचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार, कोणत्या राशींना फायदा होईल हे पाहूया..
6 ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (6 October 2024 Panchang & Rashi Bhavishya In Marathi)
मेष:- स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.
वृषभ:- संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.
मिथुन:- नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.
कर्क:- घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.
हेही वाचा – Shani Margi : दिवाळीनंतर शनीदेव ‘या’ राशींच्या लोकांना करणार श्रीमंत? नोकरी, व्यवसायात मिळू शकतो बक्कळ पैसा अन् यश
सिंह:- नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.
कन्या:- आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.
तूळ:- कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.
वृश्चिक:- मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनू:- कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.
मकर:- अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ:- तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
मीन:- जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.
(ज्योतिषी विद्याधर करंदीकर)
© IE Online Media Services (P) Ltd