Rashi Parivartan 2022 November Budh and mangal transit to bring huge opportunities with precautions for zodiac signs | Loksatta

नववर्षात ‘या राशींचे नशीब चमकणार फक्त.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व मन ‘या’ व्यक्तींपासून जपून ठेवा

Rashi Parivartan 2022 November: बुध ग्रह तूळ राशीत आणि मंगळ मिथुन राशीत वक्री होणार आहे. यामुळे कोणत्या राशीवर कसा प्रभाव दिसून येणार हे जाणून घेऊयात..

नववर्षात ‘या राशींचे नशीब चमकणार फक्त.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व मन ‘या’ व्यक्तींपासून जपून ठेवा
नववर्षात 'या राशींचे नशीब चमकणार पण.. १३ नोव्हेंबर पर्यंत धन व आरोग्य 'या' व्यक्तींपासून जपून ठेवा

Rashi Parivartan 2022 November: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलण्यासाठी परिक्रमण सुरु करतो तेव्हा सर्वांवरच त्याचा प्रभाव पडू शकतो. ठरविक काही दिवसांच्या कालावधीने ग्रहांची दिशा बदलून ते वेगवेगळ्या राशीत विजराजमान होत असतात. ग्रहांचे मार्गीकरण तसेच वक्री होणे हे मानवी जीवनात चांगले वाईट बदल घडवून आणते. काहींच्या बाबत याचा थेट तर काहींना अप्रत्यक्ष बदल दिसून येतो. यंदा दिवाळीनंतर काही दिवस म्हणजेच १३ नोव्हेंबरपर्यंत काळजी घेणे गरजेचे ठरणार आहे. या काळात बुध ग्रह तूळ राशीत आणि मंगळ मिथुन राशीत वक्री होणार आहे. यामुळे कोणत्या राशीवर कसा प्रभाव दिसून येणार हे जाणून घेऊयात..

मेष

बुध व मंगळाच्या वक्री होण्याने मेष राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढू शकतो, मात्र नशिबात यात्रेचे योग असल्याने तुम्हाला विनाकारण खर्च केला असे वाटणार नाही. प्रवासामुळे तुमच्या आरोग्यासंबंधित काही त्रास जाणवण्याची काही चिन्हे आहेत. व्यवसायात नवीन ग्राहकांशी जोडले जाण्यात समस्या येऊ शकतात त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो मात्र तुम्ही जितके स्थिर राहण्याचा प्रयत्न कराल तितके तुमच्या हिताचे ठरेल.

वृषभ

वृषभ राशिच्या व्यक्तींना पवैवाहिक जीवनांत अडचणी जाणवू शकतात आणि त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. पती- पत्नीच्या नात्यात जर गैरसमजूतीने भांडण वाढत असेल तर संवाद साधणे अजिबात टाळू नका.

तुळ

तुळ राशीच्या व्यक्तींवर या राशी परिवर्तनाचा प्रभाव उन- सावलीसारखा असेल. एकीकडे दुःखी बातमी मिळाली तरी अनेक छोटे छोटे क्षण तुम्हाला सुखावून जातील. कामाच्याबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नका विशेषतः कोणत्याही कागपत्रांवर सह्या करताना दोन वेळा तपासून पाहा.

वृश्चिक

आरोग्याच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी अनावधानानेच पण चुका होण्याचे संकेत आहेत. थोडा निष्काळजीपणाही तुम्हाला मोठ्या काळासाठी तरा देणारा ठरू शकतो. उधार देणे टाळा व बजेट बनवून त्याचे पालन करा. तुमचे मित्र व शत्रू वेळीच ओळखा.

मीन

आईसह भांडण होण्याचे दाट संकेत आहेत. घरगुती कलह मिटवण्यासाठी मौन राहण्यास प्राधान्य द्या. तुमचा हळवा स्वभाव तुमच्या मित्रांपासूनही लपवून ठेवा अन्यथा तुम्हाला मनाविरुद्ध वागायला लावण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहेमी यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ०६ ऑक्टोबर २०२२

संबंधित बातम्या

८ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? ग्रहांचा राजा सूर्य देणार प्रचंड धनलाभाची संधी
Chanakya Niti: स्त्री आणि पुरुषांनी ‘या’ गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहिजेत, नाहीतर…
२ आठवड्यांनी ‘या’ राशी होऊ शकतात अपार श्रीमंत; डिसेंबरच्या शेवटचा आठवडा देणार प्रचंड धनलाभाची संधी
१८ जानेवारी २०२३ पासून ‘या’ राशींवर लक्ष्मी होणार प्रसन्न? शनिसह बुध देणार बक्कळ धनलाभ व श्रीमंतीची संधी
२०२३ मध्ये शनिदेव करणार 3 मोठे नक्षत्र बदल! ‘या’ राशींना मिळू शकतो धनलाभ तर ‘या’ राशींना अपार कष्ट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीचा १७ डिसेंबरला मोर्चा
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच