ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह आपली रास बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर पडतो. काहींवर हा प्रभाव शुभ असतो तर काहींवर अशुभ. ११ नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे काही राशींना आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. वृषभ शुक्र ग्रह वृषभ राशीच्या सहाव्या घरातील स्वामी आहे. या काळात विवाहासाठी योग्य असणाऱ्या लोकांचे लग्न जमू शकते. तसेच काही लोकांना व्यवसायात नफा होण्याची संभावना आहे. सिंह या राशीच्या चौथ्या घराचा स्वामी शुक्र आहे. म्हणूनच या काळात या राशींच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहेत, त्यांना लाभ होऊ शकतो. तसेच, या राशीच्या लोकांच्या घरात शांततेचे वातावरण राहील. तूळ तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र हा आठव्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो, तसेच त्यांचे उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. या काळात व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे. Jupiter Transit : दिवाळीनंतर सुरु होणार ‘या’ राशींचे अच्छे दिन! गुरुदेवाचा आशीर्वाद ठरणार लाभदायक मकर या राशीच्या लोकांसाठी शुक्र हा पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. या काळात नोकरदार लोकांचे पगार वाढू शकतात. दुसरीकडे, काही लोकांना धनलाभ होण्याची संभावना आहे. वैयक्तिक जीवनासाठीही हा काळ चांगला राहील. वृश्चिक शुक्र हा वृश्चिक राशीच्या पहिल्या घराचा स्वामी आहे. म्हणूनच या काळात आयात-निर्यात संबंधित व्यवसायात करणाऱ्या लोकांना लाभ होऊ शकतो. तसेच, तुम्ही विदेश सहलीचेही नियोजन करू शकता. कुंभ या काळात कुंभ राशीच्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, करिअरमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. काही लोक या काळात नवीन वाहन खरेदी करू शकतात. संशोधन क्षेत्रातही अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. (येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)