In the month of November, Venus will enter Scorpio; 'This' signs can have sudden financial gain | Loksatta

नोव्हेंबर महिन्यात शुक्रदेव करणार वृश्चिक राशीत प्रवेश; ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ

११ नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

नोव्हेंबर महिन्यात शुक्रदेव करणार वृश्चिक राशीत प्रवेश; ‘या’ राशींना होऊ शकतो आकस्मिक धनलाभ
ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींना आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह आपली रास बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर पडतो. काहींवर हा प्रभाव शुभ असतो तर काहींवर अशुभ. ११ नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे काही राशींना आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

  • वृषभ

शुक्र ग्रह वृषभ राशीच्या सहाव्या घरातील स्वामी आहे. या काळात विवाहासाठी योग्य असणाऱ्या लोकांचे लग्न जमू शकते. तसेच काही लोकांना व्यवसायात नफा होण्याची संभावना आहे.

  • सिंह

या राशीच्या चौथ्या घराचा स्वामी शुक्र आहे. म्हणूनच या काळात या राशींच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जे लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत आहेत, त्यांना लाभ होऊ शकतो. तसेच, या राशीच्या लोकांच्या घरात शांततेचे वातावरण राहील.

  • तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र हा आठव्या आणि दुसऱ्या घराचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो, तसेच त्यांचे उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात. या काळात व्यवसायातही लाभ होण्याची शक्यता आहे.

Jupiter Transit : दिवाळीनंतर सुरु होणार ‘या’ राशींचे अच्छे दिन! गुरुदेवाचा आशीर्वाद ठरणार लाभदायक

  • मकर

या राशीच्या लोकांसाठी शुक्र हा पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. या काळात नोकरदार लोकांचे पगार वाढू शकतात. दुसरीकडे, काही लोकांना धनलाभ होण्याची संभावना आहे. वैयक्तिक जीवनासाठीही हा काळ चांगला राहील.

  • वृश्चिक

शुक्र हा वृश्चिक राशीच्या पहिल्या घराचा स्वामी आहे. म्हणूनच या काळात आयात-निर्यात संबंधित व्यवसायात करणाऱ्या लोकांना लाभ होऊ शकतो. तसेच, तुम्ही विदेश सहलीचेही नियोजन करू शकता.

  • कुंभ

या काळात कुंभ राशीच्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, करिअरमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. काही लोक या काळात नवीन वाहन खरेदी करू शकतात. संशोधन क्षेत्रातही अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
१३ नोव्हेंबरला दोन ग्रह बदलतील त्यांची चाल; ‘या’ ६ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ; नशीब असणार जोरावर

संबंधित बातम्या

१३ जानेवारी २०२३ ला मंगळ होणार मार्गी; ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; पाहा तुम्ही आहात का ते भाग्यवान?
अष्टलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ तीन राशींचे ‘अच्छे दिन’ होणार सुरु? २०२३ मध्ये अमाप पैसे व अपार श्रीमंतीचे योग
‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार झाल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? २०२२ च्या शेवटी मिळेल प्रचंड धनलाभाची संधी
१ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी
2023 Horoscope: १२ राशींसाठी येणारे २०२३ हे नवीन वर्ष कसे असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू