ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या राशीवरुन त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि त्याच्या भविष्याचा अंदाज घेतला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, जोडप्यांच्या राशीद्वारा त्यांच्या प्रेम जीवनाचा अंदाज लावला जाऊ शकतो. काही राशीच्या जोडप्यांमध्ये खूप चांगली अनुकूलता असते, परंतु काही राशींची जोडपी एकमेकांसाठी चांगली ठरु शकत नाहीत. तर कोणत्या राशीचे लोक चांगले जीवनसाथी बनू शकत नाहीत ते जाणून घेऊया.
मेष-कर्क –
मेष राशीचे लोक आपले विचार अगदी स्पष्टपणे व्यक्त करतात. तर कधी कधी विचार न करता ते अनेक गोष्टी करु शकतात आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला त्यांना आवडते. मात्र, कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील आणि भावनिक असतात ते इतरांची खूप काळजी घेतात. त्यामुळे या दोन राशीच्या जोडप्यांना ताळमेळ बसणे कठीण होऊ शकते आणि त्यांच्या नात्यात अडचणी येऊ शकतात.
वृषभ-कुंभ –
वृषभ राशीचे लोक खूप साधे आणि व्यावहारिक असू शकतात आणि ते नातेसंबंधातील स्थिरतेला महत्त्व देतात, परंतु कुंभ नाविन्यपूर्ण आणि स्वतंत्र असू शकतात. वृषभ राशीला काही वेळा कुंभ राशीला समजून घेणे खूप अवघड जाऊ शकते. त्यामुळे कुंभ राशीला ते बदलण्यास प्रतिरोधक आहे असे वाटू शकते, त्यामुळे नात्यात ताळमेळ राहू शकत नाही आणि वारंवार गैरसमज वाढू शकतात, ज्यामुळे नाते बिघडण्याची शक्यता असते.
मिथुन-कन्या –
मिथुन राशीचे लोक फार बोलके असतात, परिस्थितीशी जुळवून घेतात आणि सामाजिक उपक्रमात भाग घ्यायला त्यांना आवड असू शकते. पण कन्या राशीला फारसे सामाजिक राहणं आवडत नाही. मिथुन राशीच्या नात्यात उत्साह आणि उत्कटतेचा शोध आणि कन्या राशीची दिनचर्या यामुळे नातेसंबंधात संघर्ष होऊ शकतो.
हेही वाचा- शुक्र उदय होताच ‘या राशींचे नशीब पालटणार? नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता
सिंह-वृश्चिक –
सिंह राशीच्या लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो त्यांना स्वतःला व्यक्त करायला आणि प्रसिद्धी झोतात राहायला आवडू शकतं. तर वृश्चिक राशीचे लोक कोणाशी बोलत नाहीत. ते नातेसंबंध जपण्याला फार महत्त्व देतात. या दोन राशींच्या लोकांचे नातेसंबंध कधीकधी अहंकारामुळे अडचणी येऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
