माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते. संपूर्ण भारतभर भगवान सूर्याची जयंती म्हणून साजरी केली जाते. माघ सप्तमी, माघ जयंती आणि सूर्य जयंती या इतर नावांनी देखील ओळखले जाते. यावेळी रथ सप्तमी माघ शुक्ल सप्तमीला म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. रथ सप्तमीला दान केल्याने पाप आणि रोगांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. यासोबतच उत्तम आरोग्याचे वरदानही मिळते. रथ सप्तमीच्या दिवशी तिरुपती बालाजी मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या मंदिरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन असतं.

रथ सप्तमीला अशी करा सूर्याची पूजा?

pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
gudi padwa 2024 gudi padwa wishes date shubh muhurat rituals puja vidhi and more
Gudi Padwa 2024 : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
  • माघ शुक्ल सप्तमी (रथ सप्तमी) या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याचे दर्शन घ्यावे. यानंतर ‘ओम घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करत जल अर्पण करा.
  • सूर्यदेवाला जल अर्पण करताना पाण्यात लाल रोळी आणि लाल फुले टाकावीत.
  • जल अर्पण केल्यानंतर लाल रंगाच्या आसनावर बसावे. यानंतर सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘एहि सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते। अनुकम्पय मां भक्त्या गृहणाध्र्य दिवाकर’या मंत्राचा १०८ वेळा जप करा.
  • सूर्याला जल अर्पण केल्यानंतर रथ सप्तमीला तुपाचा दिवा लावून पूजा करावी.
  • रथ सप्तमीला सूर्य सहस्रनाम, सूर्यशक्ती आणि गायत्री मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

Ratha Saptami 2022: रथ सप्तमीला सूर्यदेवाची पूजा कशी करायची? विधी, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

माघ महिन्यातील सप्तमीला पवित्र नदीत स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे आणि दिवा दान करणे शुभ मानले जाते. रथ सप्तमीच्या दिवशी केलेल्या दानाचा उल्लेख भविष्य पुराणातही आहे. पौराणिक कथेनुसार, एका गणिकाने ऋषींनी निर्देशित केलेल्या पद्धतीनुसार सूर्याची उपासना केलली, यानंतर त्याला अप्सरांचा प्रमुख होण्याचा बहुमान प्राप्त झाला होता. असे मानले जाते की, सूर्य बलवान असेल तर करिअर आणि व्यवसायात कोणतीही अडचण येत नाही. सरकारी नोकरीसाठी सूर्य बलवान असणं गरजेचं आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळविण्यासाठी सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केलं पाहीजे.

  • सप्तमी तिथी: ७ फेब्रुवारी, सोमवार, दुपारी ४.३७ वाजल्यापासून
  • तिथी समाप्त: ८ फेब्रुवारी, मंगळवार, सकाळी ६.१५ पर्यंत
  • रथ सप्तमीला स्नानाचा मुहूर्त: ७ फेब्रुवारी, सकाळी ५.२४ ते सकाळी ७.०९
  • अर्घ्यदान वेळ: सकाळी ७.०५ वाजता