Rishi Panchami Vrat Importance: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते. ऋषीपंचमीचे हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करतात. या दिवशी सात ऋषींची पूजादेखील केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. यात कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ हे सप्त ऋषी आहेत. या व्रतामध्ये ब्राह्मणांना दान व दक्षिणा देण्याचे मोठे महत्त्व आहे. यावर्षी हे व्रत ८ सप्टेंबर २०२४ (आज) रोजी केले जाईल.

ऋषीपंचमी तिथी

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी ७ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होणार असून ८ सप्टेंबर संध्याकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार, ऋषी पंचमी ८ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल.

ऋषीपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त

  • ऋषीपंचमी पूजा मुहूर्त : सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल.
  • ऋषीपंचमी ब्रह्म मुहूर्त : सकाळी ४ वाजून ३१ मिनिटांपासून ते दुपारी ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल.
  • ऋषीपंचमीचा अभिजीत मुहूर्त : सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल.

ऋषीपंचमी व्रत आणि पूजा विधी

  • ऋषीपंचमीचे व्रत एकच वेळ जेवण करून ठेवले जाते. पूजेनंतर फळे व सुका मेवा खाऊन व्रत सोडावे.
  • घरातील पूजाघर स्वच्छ करून कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या ऋषींची पूजा करा.
  • हळद-कुंकूच्या मदतीने एक चौकोनी मंडल तयार करा. या मंडलावर सप्तऋषींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा, त्यानंतर नियमानुसार पूजा करावी.
  • सप्तऋषींना वस्त्र, चंदन, धागा, फुले आणि फळे अर्पण करा. मिठाईचा नैवेद्य दाखवा. शेवटी ऋषीपंचमी व्रताची कथा अवश्य वाचा. कथा वाचल्याशिवाय या व्रताला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही, असे म्हणतात.

ऋषीपंचमीला करा या मंत्राचा जप

कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता:।
गृह्णन्त्वर्ध्य मया दत्तं तुष्टा भवत मे सदा।।