Dhanu October Rashibhavishya 2026: धनु राशीचा स्वामी गुरू आहे. अधिकारप्रिय, सात्विक वृत्ती, न्यायी, उत्साही असे गुरुचे अनेक गुण धनु राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आपण कर्तव्यतत्पर आहात. आशावादी आणि आनंदी वृत्ती असलेली धनु रास मर्यादशील आणि प्रामाणिक असते. समाजसेवेची आपणास विशेष आवड असते. आपण दिलदार, उदार आहात. आपणास ज्ञानलालसा असते. सर्वांना घेऊन पुढे जाणाऱ्या या धनु राशीला ऑक्टोबर महिना कसा जाईल याचा आढावा घेऊया.

वर्षभरातील महत्वाच्या ग्रहांचे राशी बदल असे आहेत… (Sagittarius Horoscope September 2026)

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल वृषभ राशीत असेल. नेपच्यून आणि शनी चतुर्थातील मीन राशीतून भ्रमण करतील. द्वितीयातील मकरेतून प्लूटो भ्रमण करेल. सप्तमातील मिथुनेतून गुरू भ्रमण करेल. गुरुबल चांगले आहे.

१ जूनला गुरू अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करेल. गुरू जरी उच्च राशीत असला तरी गुरुबल थोडे कमजोर होईल. पुढे ३१ ऑक्टोबरला गुरू जेव्हा भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल तेव्हा गुरुबल चांगले मिळेल. २५ नोव्हेंबरला राहू आणि केतू वक्र गतीने अनुक्रमे द्वितीयातील मकरेत आणि अष्टमातील कर्क राशीत प्रवेश करतील.

धनु राशीचे ऑक्टोबर महिन्याचे राशीभविष्य (Sagittarius Horoscope October 2026)

पितृपक्षात नवे कार्य हाती घ्याल. होतकरू मंडळींना मदतीचा हात द्याल. विद्यार्थी वर्गाची खरी कसोटी आहे. एकाग्रतेने केलेला अभ्यास कामी येईल. घटस्थापना लाभकारक ठरेल. दसऱ्याला धनलाभ होईल. नोकरी व्यवसायात मानाची जागा भूषवाल. खुर्चीचा आदर करून योग्य निर्णय घ्याल. सर्वांच्या हिताचा विचार कराल. विवाहित मंडळींना कुटुंबासाठी मोठा आणि महत्वाचा निर्णय घेता येईल.

वाहन खरेदी कराल. आर्थिक उन्नती होईल. गुंतवणूकदारांच्या मेहनतीला उत्तम फळ मिळेल. सबुरी आणि सातत्य कामी येईल. जमिनीचे, वडिलोपार्जित इस्टेटीचे व्यवहार सांभाळून कराल. ३१ ऑक्टोबरला गुरू भाग्यातील सिंह राशीत प्रवेश करेल. सिंहस्थ गुरू असेल. गुरुबल चांगले मिळेल. प्रयत्नांना पुष्टी मिळेल. आरोग्य चांगले राहील.

– ज्योतिषी सोनल चितळे