ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांचे विश्लेषण केल्यानंतर, त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्व सांगितले जाते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या अवयवांचा आकार आणि तीळ यांचे विश्लेषण करून त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगितले आहे. आज आपण चेहऱ्याच्या आकाराबद्दल बोलणार आहोत. सर्व काही चेहऱ्यावर लिहिलेले असतं, असं म्हटलं जातं. पण माणूस कसा आहे, त्याची विचारसरणी कशी आहे हे खरंच चेहऱ्यावर लिहिलेले असते का, जाणून घेऊया सामुद्रिक शास्त्र काय सांगतं.

गोल चेहऱ्याचे लोक:

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
how to make sabudana papad at home recipe
Recipe : वर्षभर टिकणारे साबुदाणा पापड कसे बनवावे? पापडाचे वाळवण कसे घालावे? पाहा हे प्रमाण
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचा चेहरा गोल असतो ते खूप आनंदी असतात. अशा लोकांना जीवनातील प्रत्येक प्रसंगात सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला आवडतो. या लोकांना साहसी जीवन व्यतीत करण्याची इच्छा असते. हे लोक नेहमी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. गोल चेहरा असलेल्या लोकांचा स्वभाव विनोदी असतो.

बारीक चेहरा असलेले लोक:

बारीक चेहरा असलेले लोक चिडखोर असतात. असं म्हटलं जातं की, हे लोक नकारात्मकतेने भरलेले असतात. त्यांना प्रत्येक परिस्थितीची काळजी वाटते. हे लोक तोंडावर बोलण्यात विश्वास ठेवतात. त्यांना स्वतंत्र जगायला आवडतं, कोणी आदेश दिलेलं त्यांना आवडत नाही.

लांब चेहरा लोक:

लांब चेहरा असलेले लोक इतरांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यांना जीवनात यशाचा आनंद घेण्याची इच्छा असते. हे लोक रोमँटिक देखील असतात. तसेच त्यांच्याकडे बोलण्याची कला असते, त्यामुळे ते समोरच्या व्यक्तीला पटकन प्रभावित करतात.

अंडाकृती चेहरा असलेले लोक:

ज्या लोकांचा चेहरा अंडाकृती आहे. हे लोक खूप कामुक असतात. त्यांना नवीन मित्र बनवायला आवडतात. हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, ते नेहमी त्यांच्या पार्टनरसोबत वेळ घालवतात.