scorecardresearch

समुद्रशास्त्र: ओठांवर तीळ असणारे लोक असतात सर्वांपेक्षा वेगळे; जाणून घ्या ओठावरील तिळाचे महत्व

शरीरावर असलेल्या प्रत्येक तीळाचे स्वतःचे महत्त्व असते.

वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्याच्या कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या ग्रहांचे विश्लेषण केले जाते. त्याचप्रमाणे समुद्रशास्त्रात मानवी शरीराचे अवयव आणि तीळ यांच्या आधारे संदर्भ लावले जातात. शरीरावर असलेल्या प्रत्येक तीळाचे स्वतःचे महत्त्व असते. आज आम्ही अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या ओठांवर तीळ आहे.

तीळ ओठाखाली असल्यास:

समुद्रशास्त्रानुसार ओठाच्या खाली तीळ असेल तर कायम गरीबी राहते. ज्यांच्या ओठाच्या वर डाव्या हाताला तीळ असतो, ते आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. तसेच, हे लोक धाडसी, हुशार, मेहनती आणि प्रामाणिक मानले जातात. कष्ट करून ते कोणत्याही कामात यश मिळवू शकतात.

ओठावर तीळ असल्यास:

स्त्री-पुरुषाच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळाचे चिन्ह असल्यास त्यांचे जोडीदाराशी प्रेमाचे नाते असते. त्यांच्यामध्ये नाते खूप चांगले टिकून राहते. हे लोक खूप मेहनती असतात आणि मेहनतीच्या जोरावर ते आयुष्यात चांगले स्थान मिळवतात. ते खूप हुशार असतात. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या मदतीने ते काहीही साध्य करण्यास सक्षम असतात. तसेच, ते स्वतःचे नशीब स्वतः बनवण्यावर विश्वास ठेवतात.

खालच्या ओठाच्या मध्यभागी तीळ:

खालच्या ओठाच्या मध्यभागी तीळ असल्यास व्यक्ती भावनांनी परिपूर्ण असतात. अशा व्यक्तीला खूप लवकर रडू येते. पण त्याचवेळी हे लोक खूप रागीट असतात. तसेच, हे लोक मनी माइंडेड असतात आणि त्यांना पैसे कमविण्याचा छंद असतो. हे लोक मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सक्रिय भाग घेतात.

खालच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ:

असे मानले जाते की खालच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असलेले लोक खूप प्रामाणिक असतात. प्रामाणिकपणामुळे या लोकांना अनेक वेळा त्रास सहन करावा लागतो. पण त्यांचे हे वागणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. या लोकांना उशीर केलेला आवडत नाही, त्यांना प्रत्येक गोष्ट वेळेवर करायला आवडते. कामाच्या ठिकाणी लोक त्यांच्या या सवयीने खूश असतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samudra shastra oceanography what is the meaning of mole having on lips hrc

ताज्या बातम्या