scorecardresearch

समुद्रशास्त्र: जाणून घ्या कसा असतो गालावर तीळ असणाऱ्या लोकांचा स्वभाव; ‘या’ गालावर तीळ असल्यास होते फसवणूक!

जाणून घ्या गालावर तीळ असल्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक कशी असते.

(संग्रहित छायाचित्र)

हस्तरेषाशास्त्रानुसार, आपल्या शरीरावर असलेल्या प्रत्येक तीळाचे स्वतःचे महत्त्व आहे. पण शरीरावरील प्रत्येक तीळ अशुभ नसतो. काही तीळ शुभही असतात. काही तीळ आपल्या करिअर आणि भविष्याबद्दल देखील सांगतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गालावर तीळ असल्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक कशी असते.

ज्या लोकांच्या गालाच्या मध्यभागी तीळ असतो, असे लोक खूप भावूक असतात. असे मानले जाते की या लोकांचे नशीब खूप चांगले असते. हे लोक इतरांच्या बोलण्यात पटकन गुंतून जातात. तसेच, ते इतरांवर प्रभाव पाडण्यास सक्षम असतात. दुसऱ्यांच्या बोलण्याने ते पटकन नाराज होतात.

गालाच्या वरच्या भागावर तीळ असणे:

शास्त्र सांगते की ज्या लोकांच्या गालाच्या वरच्या बाजूला तीळ असतो, असे लोक खूप सृजनशील असतात. हे लोक कोणतेही काम साध्या पद्धतीने करत नाही. त्यांना प्रत्येक कामात आपली कला दाखवायची असते. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. त्यांच्या आयुष्यात पैशाची स्थितीही चांगली राहते. असे लोक नेहमी लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात.

असे लोक सहनशील असतात:

सामुद्रिक शास्त्रामध्ये असे मानले जाते की ज्या लोकांच्या गालावर खालच्या भागात तीळ असते, असे लोक खूप सहनशील असतात. या लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण तरीही जीवनातील कठीण प्रसंगांशी लढत ते पुढे जातात. ते मानतात की जीवन हा दु:खाचा महासागर आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो.

गालाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तीळ:

असे मानले जाते की ज्या लोकांच्या उजव्या बाजूला तीळ असते ते खूप श्रीमंत असतात. त्यांना कशाचीही कमतरता नाही. ते कायम वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर डाव्या बाजूला तीळ असलेल्या लोकांना अनेकदा एकटेपणा जाणवतो. त्यांना लोकांसोबत बसणे आवडत नाही. असे म्हणतात की ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ असतो, त्यांच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि प्रणय कायम राहतो. त्याच वेळी, डाव्या गालावर तीळ असणे जीवनात फसवणूक दर्शवते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samudra shastra oceanography what mole present on cheek says know hrc

ताज्या बातम्या