Samudrik Shastra: सुंदर, रेखीव भुवया या स्त्री व पुरुषाच्या सौंदर्यात मोठी भर घालतात. यासाठीच अनेकजण पार्लरमध्ये जाऊन खूप खर्चही करतात पण तुम्हाला ठाऊक आहे आहे नैसर्गिकरित्या तुमच्या भुवयांचा आकार जसा आहे त्यावरून तुमचा स्वभाव व तुम्हाला येणाऱ्या अडचणी यांचा अंदाज येतो. सामुद्रिक शास्त्र म्हणजेच शरीराच्या ठेवणीचा अभ्यास करणारा ज्योतिषशास्त्राचा एक भाग. याच शास्त्रानुसार तुमच्या शरीरावरील अगदी लहान चिन्ह जसे की तीळ, नख व भुवया तुमच्या स्वभावाची माहिती देत असतात. आज आपण व्यक्तीच्या भुवया त्याच्याविषयी काय सांगतात हे पाहणार आहोत, चला तर मग..

भुवयांमध्ये खूप अंतर

काही व्यक्तींच्या भुवयांमध्ये खूप अंतर व आकार सपाट असतो. शास्त्रानुसार अशा व्यक्ती खूप बडबड्या असतात, पण त्यांना काहीही उलट उत्तर दिल्यास ते लगेच भावुक होतात. अशा व्यक्तींना इतरांबद्दल गॉसिप ऐकून घ्यायला आवडते मात्र ते स्वतःविषयी एकही शब्द ऐकू शकत नाहीत. अनेकदा सवयीनमुळे या व्यक्ती गोत्यात येतात.

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

जास व ठसठशीत भुवया

अशा भुवया असणे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र या भुवया सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाचा रागीट स्वभाव दर्शवतात. अशा व्यक्ती तशा खूप तल्लख असतात, यांना काम करून घेण्यासाठी कोणाशी कसे वागायचे याचा पटकन अंदाज येतो . पैसे कमावणे हे त्यांच्या आयुष्याचे मोठे ध्येय असते. मनातून अनेकदा या व्यक्ती हळव्या असतात, त्यांना एकटेपणाची भावना खूपदा जाणवते.

Samudrik Shastra: झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव; पोटावर झोपणारे बिनधास्त तर पाय दुमडून..

लहान भुवया

काहींच्या भुवया पूर्ण डोळयाच्या आकारापेक्षाही लहान असतात. सामुद्रिक शास्त्र सांगते की अशा व्यक्ती एक साधा निर्णय घेतानाही १०० वेळा विचार करतात, अनावश्यक विचार करण्यात अनेकदा त्यांचे निर्णय फसतात. मात्र अशा व्यक्ती निरागस असतात त्यांना कधीच कोणाचे वाईट चिंतण्याची सवय नसते. या स्वभावाचा अनेकजण फायदाही घेतात.

चंद्राप्रमाणे भुवया

शक्यतो अशा भुवया महिलांच्या असतात त्यांना चंद्रकोरेचा आकार असतो. या महिला खूप भाग्यवान असतात. त्यांना लग्नांनंतर सासरीही खूप मान मिळतो. यांचे आयुष्य सुख- समृद्धीने परिपूर्ण असते. अशा महिला इतरांचे नशीबही उजळतात असे शास्त्र सांगते.

Samudrik Shastra: पाय बघून ठेवा विश्वास; उंच अंगठा म्हणजे बोलबच्चन, तर चौरस पाय असल्यास..

‘वी’ आकाराच्या भुवया

इंग्रजी अक्षरं व्ही प्रमाण ज्यांच्या भुवया असतात त्यांची बुद्धी व्यापारी असते. व्यवसायाचं जन्मजात ज्ञान त्यांना प्राप्त असतं, अनेकदा अशा व्यक्तींना आपल्या अर्तबगारीचा अंदाज नसतो म्हणून ते मागू राहू शकतात मात्र एकदा त्यांना हवी तशी एक कल्पना मिळाली की त्यांची भरभराट होते. नाखूनों के निशान से जान

जोडलेल्या भुवया

अलीकडे अनेकजण निसर्गतः जोडलेल्या भुवया असतील तर त्यावर उपचार करतात. पण सामुद्रिक शास्त्र जोडलेल्या भुवया नशीबवान व्यक्तीला असतात असे सांगते. अशा व्यक्तींना आयुष्यात एकसंधपणा आवडतो.

(टीप- वरील लेख हा गृहीतके व सामान्य माहिती आधारित आहे)