Horoscope Today 5 April 2026 In Marathi : आज ५ एप्रिल २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. त्याचबरोबर हर्षण वैधृती योग जुळून येईल आणि शुक्ल नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मराठी नवं वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे. तुमच्यासाठी हा दिवस कसा असणार जाणून घेऊयात…

दैनिक पंचांग व राशिभविष्य, ५ एप्रिल २०२६ (Today Horoscope 5 April 2026 In Marathi)

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

कामातील बदल समजून घ्या. कामाचा व्याप वाढता राहील. मनावर फार ताण घेऊ नका. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

घराची दुरूस्ती काढाल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल. प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

मित्रा मंडळींचा गोतावळा जमवाल. विश्वासू लोकांकडेच मन मोकळे करावे. व्यावसायिक अडचणी दूर कराव्यात. सामाजिक कामाकडे ओढ वाढेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आपली आब राखून राहाल. पथ्य पाण्याकडे लक्ष द्यावे. मानसिक सौख्य जपावे.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

कामाच्या ठिकाणी व्याप वाढता राहील. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे. मित्रांची मदत वेळेवर मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. घरच्या मंडळींचे सौख्य वाढेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

एकमेकांच्या बाजू विचारात घ्याव्यात. आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा. राहत्या घराचे प्रश्न उभे राहतील. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात . घाई घाईने कोणतेही काम करू नका.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

तब्येतीत सुधारणा दिसून येईल. दगदग वाढली तरी फळ चांगले मिळेल. मैत्रीत गैरसमज संभवतात. चांगल्या संगतीत राहावे. जवळचा प्रवास काळजीपूर्वक करा.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. इतरांच्या सल्ल्याने नवीन योजना आखाल. घरच्या दुरूस्तीचे काम निघू शकते. मनावर काहीसे दडपण राहील. कामातून समाधान शोधावे.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

जोखमीचे व्यवहार सावधतेने करा. प्रेम प्रकरणात जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील. . सहकार्‍यांकडून कौतुक केले जाईल. नवीन आर्थिक योजना आखाल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

उष्णतेचे विकार संभवतात. कामाचा आलेख वाढता राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो. वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

सामाजिक कामातून ओळखी वाढतील. स्थावरचे व्यवहार जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न करा. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा होतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर